१९९४ मध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी, रविना टंडन स्टारर फिल्म ‘मोहरा’ रिलीज झाला होता. चित्रपटासोबत यामधील गाणी देखील खूप सुपरहिट झाली होती. या चित्रपटामध्ये एक अशी अभिनेत्री होती जिने आपल्या सौंदर्याने आणि निरागसतेने लाखो हृदयांवर राज्य केले.

तथापि यानंतर तिला आपल्या करियरमध्ये जास्त सफलता मिळाली नाही. पुन अभिनेत्री विस्मृतीत गेली. त्या अभिनेत्रीचे नाव पूनम झावर आहे. पूनम मोहरा चित्रपटामधील ना कजरे की धार, ना मोतियों का हार या गाण्यामध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिने सुनील शेट्टीसोबत सीन दिले होते. ९० च्या दशकामध्ये हे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.

पूनम झावर या चित्रपटामध्ये सुनील शेट्टीच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये दिसली होती. या चित्रपटामधील गाण्यामध्ये तिने आपल्या इंडियन लुकमधून दर्शकांना वेड लावले होते. साडी घालून पूनम खूपच सुंदर दिसली होती. या चित्रपटानंतर पूनम दीवाना हूं मैं तेरा, द ब्लॅक अँड व्हाइट फॅक्ट, आंच, आर राजकुमार आणि ओ माय गॉड सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली होती.

तसे तर खूपच कमी लोकांना माहिती आहे कि मोहरानंतर पूनम इतर अनेक गाण्यांमध्ये काम करताना दिसली होती. हाय शरमाऊं या म्युझिक व्हिडीओमध्ये पुन हटके लुकमध्ये पाहायला मिळाली होती. या गाण्यामध्ये पूनमचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला होता.

या गाण्यामधील पूनम झावरचा अंदाज पाहून प्रत्येकजण हैराण झाला होता. इतकेच नाही तर काही लोक पूनमला ओळखू देखील शकले नाहीत. असो पूनम शाहिद कपूरच्या आर राजकुमार चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होतीयानंतर ती मोठ्या पडद्यावर जास्त दिसली नाही. पूनमचा लुक खूपच बदलला आहे. छोट्या केसांमध्ये पूनमचा लुक खूपच हटके दिसत आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.