तारक मेहतामधील मुनमुन दत्ताने केला मोठा खुलासा, म्हणाली, माझे विवाहित मित्र माझ्यासोबत… ”

By Viraltm Team

Published on:

एक दशकापेक्षा जास्त काळ दर्शकांचे मनोरंजन करणारी सब टीव्हीवरील प्रसिद्ध सिरीयल तारक मेहता का उलटा चष्मा आज देखील तितकीच फेमस आहे. दर्शक आवडीने हि सिरीयल पाहतात. सध्या या सिरीयलमधील अनेक कलाकार सिरीयल सोडून जात आहेत. या सिरीयलमधील बबिताने म्हणजे मून मून दत्ताने मोठा खुलासा केला आहे.

जेठालाल हि भूमिका सिरीयलमधील प्रसिद्ध भूमिकांपैकी एक आहे. दैनंदिन आयुष्यामधील अडचणींमुळे पिचलेला जेथालाला सोसायटीमधील बबिताच्या मागे लागलेला असतो. तिच्यासोबत बोलण्यासाठी तो काहीना काही युक्ती काढत असतो. बबिताची भूमिका मुनमुन दत्ताने साकारली आहे.

मुनमुन दत्ता अभिनेत्री बनण्या अगोदर मॉडेलिंग करत होती. तिच्या लुकमुळेच तिला हि भूमिका ऑफर झाली होती. विशेष म्हणजे मुनमुन रियल लाईफमध्ये देखील एक जेठालाल होता. अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला होता.

ती म्हणली कि माझे बरेच मित्र असे आहेत जे लग्न झालेले आहेत आणि ते मला खूप पसंद करतात. माझ्यासोबत फ्लर्ट करतात. पण असा प्रकार कोणत्याच महिलेला आवडत नाही. अर्थात मलाही आवडत नाही. मात्र असे मित्र नुकसान करणारे नाहीत तर ते तुमची प्रशंसा करतात.

हम सब बाराती या सिरीयलमधून अभिनेत्रीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. या सिरीयलमध्ये तिच्यासोबत दिलीप जोशी म्हणजे जेठालाल देखील होते. यादरम्यानच त्यांची ओळख झाली होती. त्यांनी मुनमुनला तारक मेहता सिरीयलमध्ये आणले होते.

मुनमुनचे स्वतःचे यूट्यूब चॅनलदेखील देखील आहे. यावरून ती आपले फिटनेसचे व्हिडीओ शेयर करत असते. मुनमुन पश्चिम बंगालची आहे तिचा जन्म २८ सप्टेंबर १९८७ रोजी एका बंगाली कुटुंबामध्ये झाला होता. तिने इंग्रजी विषयामध्ये पदवी घेतली आहे. मुंबई एक्सप्रेस, हॉलिडे यासारख्या चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे.

Leave a Comment