वयाच्या ७४ व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीने केला ‘वि’वा’हबाह्य’ सं’बं’धाविषयी मोठा खुलासा, म्हणाली पुरुषांसाठी…

By Viraltm Team

Published on:

ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी नुकतेच एका मुलाखतीदरम्यान विवाहबाह्य संबंधाविषयी मोठा खुलासा केला आहे. मयूर माधवानी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर आयुष्यामध्ये मोठे वादळ आले होते आणि काही काळ मला संसारामध्ये दुखाचे चटके सोसावे लागले असे त्यांनी या दरम्यान सांगितले.

मुलाखतीदरम्यान मुमताज यांनी सुरुवातीला आपले पती मयूर माधवानी यांच्या अफेयर्स विषयी पसरलेल्या अफवांविषीय खुलासा केला. त्या म्हणाल्या कि, पुरुषांसाठी अफेयर्स म्हणजे एक खूपच सामान्य बाब आहे. ती सहजपणे मागच्या दरवाजामधून आयुष्यामध्ये येते आणि त्याचा आपल्याला पत्ता देखील लागत नाही. पण मला माझ्या नवऱ्याचा अभिमान आहे कारण त्याने याविषयी माझ्यापासून काहीच लपवले नाही. सर्व काही खरे खरे सांगितले.

माझे पती मला म्हणाले कि मी जेव्हा अमेरिकेमध्ये होतो तेव्हा मला एक मुलगी आवडायला लागली. कारण त्यांचा जन्म तिथेच झाला होता आणि तिथेच ते लहानाचे मोठे झाले. त्यामुळे त्यांचे अमेरिका आणि तिथल्या लोकांशी एक वेगळेच कनेक्शन होते.

त्यांनी मला हे देखील सांगितले कि ते नेहमी तिच्यावर प्रेम करत राहतील आणि तिला कधीही सोडणार नाहीत. पण आता ते सर्वकाही संपले आहे. माझ्या नवऱ्याने मला राणीसारखे ठेवले. मी जे काही मागितले ते सर्वकाही मिळाले, असे देखील मुमताज म्हणाल्या. मुलाखती दरम्यान मुमताज यांनी स्वतःबद्दल देखील मोठा खुलासा केला. त्या म्हणाल्या ज्यावेळी माझ्या नवऱ्याने मला सर्वकाही सांगितले तेव्हा मला खूपच एकटे एकटे वाटत होते. मी मनातून खूप दुखावले गेले होते.

पण हे देखील तितकेच खरे आहे कि ते सर्व क्षणिक होते आणि तेवढे गंभीर नव्हते. याउलट मी खूपच लकी आहे कि माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. काही दिवसांपूर्वी मुमताज यांना पोटदुखीमुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. पण आजाराशी झुंज दिल्यानंतर त्या आपले आयुष्य चांगले जगत आहेत.

Leave a Comment