सिनेसृष्टी पुन्हा हा’द र’ली ! कोई मिल गया चित्रपटामध्ये काम केलेल्या ‘या’ दिग्गज अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने नि ध न…

By Viraltm Team

Updated on:

बॉलीवूडमधून नुकतेच एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी आता या जगामध्ये राहिले नाहीत. ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी लखनऊमध्ये त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नि ध न झाले.

गेल्या काही दिवसांपासून ते हार्ट संबंधी अनेक समस्यांचा सामना करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला होता. यानंतर ते मुंबईहून लखनऊला शिफ्ट झाले होते. लखनऊमध्ये त्यांचे होमटाउन आहे. त्यांनी ३ ऑगस्ट रोजी शेवटचा श्वास घेतला.

मिथिलेश चतुर्वेदी यांना कोई मिल गया, ग़दर एक प्रेम कथा, स्कॅम १९९२ सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. याशिवाय ते क्रेजी ४ चित्रपटामध्ये देखील दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक जयदीप सेन यांनी सांगितले कि मिथिलेश चतुर्वेदी यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. ज्यामुळे ते आपले होम टाउन लखनऊला गेले होते. तिथे त्यांचे ३ ऑगस्ट रोजी नि ध न झाले.

दिग्दर्शक जयदीप सेन यांनी सांगितले कि मिथिलेश चतुर्वेदी यांचे खूपच जवळचे नाते होते. कारण त्यांनी कोई मिल गया आणि क्रेजी ४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. ते पुढे म्हणाले कि क्रेजी ४ त्यांचा पहिला दिग्दर्शित चित्रपट होता. अशामध्ये आज त्यांच्या निधनामुळे ते खूपच दुखी झाले आहेत. त्यांनी त्यांचे कौशल्य आणि प्रतिभा जवळून पाहिली आहे. यामुळे आज त्यांच्या जाण्यामुळे त्यांना खूपच दुख झाले आहे. मुंबईला येण्यापूर्वी ते लखनऊमध्ये थिएटरमध्ये काम करत होते.

थिएटरसोबत ते सरकारी नोकरी देखील करत होते. जवळ जवळ २५ वर्षे त्यांनी सरकारी नोकरी केली. जेव्हा त्यांनी पाहिले कि नोकरी पेशनेबल झाली आहे तेव्हा त्यांनी वोलंटरी रिटायरमेंट घेतली आणि ते मुंबईला निघून आले. मिथिलेश चतुर्वेदी यांना पहिला प्रोजेक्ट उसूल हि सीरियल होती.

या सिरीयलमध्ये त्यांच्यासोबत डेनी डेंगजोंग्पा देखील होते. नंतर डीडी नॅशनलवर प्रसारित होणाऱ्या न्यायमध्ये त्यांना भूमिका मिळाली. त्यानंतर ते सत्या आणि भाई चित्रपटामध्ये दिसले होते. पण त्यांचे फिल्मी करियर जास्त दिवस चालले नाही कारण ते खूप आळशी होते.

Leave a Comment