हिंदी चित्रपटामधील अभिनेता आणि लोकप्रिय मॉडल मिलिंद सोमण नेहमी आपल्या फिटनेसमुळे चर्चेचा विषय बनलेला असतो. अभिनेता मिलिंद आता ५६ वर्षाचा झाला आहे. तथापि या वयामध्ये देखील तो एखाद्या २६ वर्षाच्या तरूणासारखा दिसतो. तो खूपच फिट आहे आणि त्यांच्यामध्ये कमालीची स्फूर्ती आहे.
मिलिंद आपल्या फिटनेसची खूपच काळजी घेत असतो. ५६ वयामध्ये देखील त्याने स्वतःला खूप फिट ठेवले आहे. मिलिंदच्या फिटनेसला तोडच नाही. तो फक्त भारतामध्ये लोकप्रिय नाही तर फिटनेसच्या बाबतीत तो जगामध्ये देखील फेमस आहे आणि त्याने आपला एक वेगळा बेंचमार्क सेट केला आहे.
४ नोव्हेंबर १९६५ रोजी यूनाइटेड किंगडम येथे जन्मलेल्या मिलिंद सोमणने आपली एक खास ओळख बनवली आहे. मिलिंद आपल्या फिटनेसशिवाय आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील खूप चर्चेमध्ये राहतो. नुकतेच अभिनेता मिलिंदने आपल्या पर्सनल लाईफबद्दल अनेक सिक्रेट उघड केले आहेत आणि अभिनेत्याने आपल्या बेडरूम सीक्रेटवरून देखील पडदा उठवला आहे.
मिलिंदने दोन लग्ने केली होती. त्याचे पहिले लग्न २००६ मध्ये मायलिन जम्पोनईसोबत झाले होते. पण लग्नाच्या तीन वर्षांनंतर दोघे २००९ मध्ये वेगळे झाले होते. याच्या ९ वर्षानंतर मिलिंदने २०१८ मध्ये दुसरे लग्न केले. त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव अंकिता कोंवर आहे जी त्याच्यापेक्षा २६ वर्षाने लहान आहे.
नुकतेच मिलिंद आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल आणि से क्स ड्राइवबद्दल बोलताना म्हणाल कि, लोक खूपच कमी वेळा मला आमच्या से क्स ड्राइवबद्दल प्रश्न विचारतात. हे खूपच नॉर्मल आहे कारण आज देखील मी स्वतःला त्या वयाचा समजतो जितके वय माझ्या पत्नीचे आहे. माझ्या पत्नीपेक्षा जास्त मी स्वताला फिजिकली फिट ठेवतो.
मिलिंद सोमणच नाही तर त्याची पत्नी अंकिता कोंवर देखील फिटनेस फ्रिक आहे. सोशल मिडियावर दोघेही खूप लोकप्रिय आहेत आणि सक्रीय आहेत. इंस्टाग्रामवर दोघेही आपले फोटो पोस्ट करतात जिथे त्यांची फिटनेस पाहण्यासारखी असते. ३० वर्षाची अंकिता आणि ५६ वर्षाचा मिलिंद फिटनेसच्या बाबतीत प्रत्येकासाठी प्रेरणा आहेत.
इंस्टाग्रामवर मिलिंदला ११ लाख पेक्षा जास्त लोक फॉलो करतात. मिलिंदचे इंस्टाग्राम अकाऊंट त्याच्या जबरदस्त फिटनेसच्या फोटोंनी भरलेले आहे. तर अंकिताला देखील सोशल मिडियावर लाखो लोक फॉलो करतात. इंस्टावर अंकिताला जवळ जवळ अडीच लाख लोक फॉलो करतात. मिलिंद प्रमाणे अंकिता कोंवरचे देखील अकाऊंट फिटनेस फोटोंनी भरलेले आहे.
मिलिंदच्या वर्कफ़्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो काही दिवसांपूर्वी पौराशपुर वेबसिरीजमध्ये पाहायला मिळाला होता. आता तो पुन्हा एमटीवी सुपरमॉडल ऑफ द ईयर – २ मध्ये जज म्हणून दिसणार आहे. यादरम्यान लाइका अरोरा आणि अनुषा दांडेकर त्याची साथ देणार आहेत.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.