प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, वर्षभरापूर्वी वडिलांना गमवल्यानंतर आता आईचे निधन…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमधील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक मनोज बाजपेयीची आई गीता देवीचे निधन झाले आहे. दीर्घ आजारामुळे अभिनेत्याच्या आईने गुरुवारी सकळी दिल्ली येथील एका हॉस्पिटलमध्ये सकाळी ८.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय ८० वर्षे होते.

माहितीनुसार मनोज बाजपेयीची आई गीता देवीवर आजारामुळे काही दिवसांपासून दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. गेल्या एक आठवड्यामध्ये गीता देवीची प्रकृती खूपच खालावली होती. ज्यानंतर त्यांना दिल्लीच्या पुष्पांजली मेडिकल सेंटर आणि मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

आईच्या निधनानंतर मनोज बाजपेयीचे सर्व कुटुंब शोकग्रस्त आहे. अभिनेता मनोज बाजयेपी देखील खूपच खचला आहे आणि दुःखाच्या प्रसंगी तो कुटुंबाला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनेत्याच्या आईच्या निधनाची बातमी अशोक पंडित यांनी ट्वीट करून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे कि मनोज बाजयेपी तुमच्या आईच्या निधनावर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत, ओम शांती.

मनोज बाजपेयीच्या आईवडिलांचे निधन एक वर्षाच्या अंतराने झाले. वास्तविक मनोज बाजपेयीचे वडील राधाकांत बाजपेयी यांचे निधन गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये झाले होते. नेहमी मुलाखतीदरम्यान अभिनेता आपल्या आईचा उल्लेख जरूर करायचा. एका वर्षामध्ये आईवडिलांना गमवल्यानंतर अभिनेता पूर्णपाने खचला आहे.

अभिनेता मनोज बाजपेयीचा जन्म बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्याच्या बेलवामध्ये झाला होता. तो राष्ट्रीय नाट्य विद्यालयमध्ये सामील होण्यासाठी दिल्लीला आला होता आणि नंतर अभिनेत्याने अभिनेता बनण्यासाठी आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला आला.

Leave a Comment