सध्या सामान्य लोकांपासून ते सेलेब्रिटी पर्यंत प्रत्येकासोबत अनेक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर येत आहे. सेलेब्रिटी नेहमी आपल्यासोबत अनुभव सोशल मिडियावर शेयर करत असतात. नुकतेच मराठमोळी अभिनेत्री मनवा नाईकने आपल्यासोबत घडलेल्या अनुभवाला शेयर केले आहे.
अभिनेत्रीची फेसबुक पोस्ट सध्या खूपच चर्चेचा विषय बनली आहे. मराठी अभिनेत्री मनवा नाईक सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते. ती नेहमी कोणतीना कोणती पोस्ट शेयर करून चाहत्यांसोबत संपर्कामध्ये राहत असते. अभिनेत्रीने एक धक्कादायक पोस्ट शेयर करत चाहत्यांना धक्का दिला आहे.
अभिनेत्रीने पोस्ट शेयर करत लिहिले आहे कि मला खूपच भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. जो तुमच्यासोबत शेयर करावाच लागेल. मी रात्री ८.१५ वाजता उबर बुक केली होती. बीकेसीमध्ये आल्यानंतर उबर चालक फोनवर बोलू लागला, यादरम्यान मी त्याला फोन बंद करण्याचा सल्ला. यादरम्यान त्याने बीकेसी सिग्नल देखील तोडला.
हे करण्यापासून मी त्याला वारंवार थांबवत होते. पण तो काही ऐकत नव्हता. यादरम्यान त्याला वाहतूक पोलिसांनी अडवले. तो पोलिसांसोबत देखील हुज्जत घालू लागला. यामध्ये मी हस्तक्षेप करत पोलिसांना सांगितले, यादरम्यान उबर चालकाला राग आला आणि ती मला म्हणाला तू भरणार आहेस का ५०० रुपये?
यावर मी त्याला म्हंटले कि तू फोनवर बोलत होतात, यानंतर उबर जसे जसे पुढे जाऊ लागली तसे तो मला धमक्या देऊ लागला. तो मला म्हणाला तू थांब मी तुला चांगलेच पाहतो. मी त्याला गाडी पोलीस स्टेशनला नेण्यास सांगितले. पण त्याने तसे केले नाही.
मध्ये मध्ये गाडी थांबवत तो माझ्यासोबत वाद घालत होता. बीकेसी कुर्ला पुलावर आल्यानंतर तो पुन्हा गाडी थांबवू लगला. तो मला म्हणाला थांब तुला दाखवतो. यावेळी मी उबर सेफ्टीला फोन केला. गाडी कुनाभट्टी रोडवरून प्रियदर्शनी पार्कपर्यंत आल्यानंतर मी त्याला थांबण्यास सांगितले. पण तो ऐकला नाही. तो कुणाला तरी हाक मारू लागला तसे मी जोरजोराने ओरडायला सुरुवात केली. यानंतर दोन बाईकस्वार आणि एक रिक्षावाला तिथे येऊन मला वाचवले. मी खूपच घाबरले होते.
अभिनेत्री मनवा नाईकचा घडलेला हा प्रसंग ऐकून सर्वजण चकित झाले आहेत. या पोस्टवर सध्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. रात्री अशा वाहनांमधून प्रवास करणं किती सुरक्षित आहे? असा देखील प्रश्न आता समोर आला आहे.
View this post on Instagram