९० च्या दशकामधील बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी एके काळी सफल अभिनेत्रींपैकी एक होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि लोकांच्या मनामध्ये एक खास जागा निर्माण केली आहे. चित्रपट असो किंवा पर्सनल लाईफ ती जे काही करायची तो चर्चेचा विषय बनायचा. ममताने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने दर्शकांच्या मनामध्ये एक खास जागा निर्माण केली होती. तिचा जन्म २० एप्रिल १९७२ रोजी मुंबईमध्ये झाला होता. तथापि बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये ९० च्या दशकामध्ये से क्स सिंबल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री साध्वी बनली.
ममताने आपल्या अभिनय करियरची सुरुवात तमिळ इंडस्ट्रीमधून केली होती. ननबरगल हा तिचा पहिला चित्रपट होता जो १९९१ मध्ये रिलीज झाला होता. अभिनेत्रीने आपला बॉलीवूड डेब्यू तिरंगा या मल्टी स्टारर चित्रपटामधून केला होता. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत नाना पाटेकर आणि दिग्गज अभिनेता राजकुमार होते. तथापि ममताला खरी ओळख आशिक आवारा चित्रपटामधून मिळाली. या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले होते. राज कुमार आणि नाना पाटेकरसोबत आपले फिल्मी करियर सुरु करणारी ममता कुलकर्णी त्यावेळी टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.
ममताने शाहरुख खान, सलमान खान सारख्या मोठ्या अभिनेत्यांपासून ते अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले. ममताने आपल्या फिल्मी करियरमध्ये वक्त हमारा है, क्रांतिवीर, करण अर्जुन, बाजी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेत्रीचे फिल्मी करियर खूपच हिट होते पण तिची पर्सनल लाईफ नेहमी विवादित राहिली. माहितीनुसार असा दावा केला जातो कि अभिनेत्रीचे अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध होते. ममता आणि अंडरवर्ल्डच्या कनेक्शनच्या नेहमी चर्चा होऊ लागल्या जेव्हा अभिनेत्रीने ड्र ग माफिया विक्की गोस्वामीसोबत २००२ मध्ये लग्न केले होते.
विक्की गोस्वामीसोबत लग्न केल्यानंतर ममता केनियामध्ये स्थायिक झाली आणि बॉलीवूडला अलविदा केले. यानंतर ममताचे नाव पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले जेव्हा तिचे आणि तिच्या पत्नीने नाव एका आंतरराष्ट्रीय ड्र ग्ज रॅकेटशी जोडले गेले. ममताने आशा कोणत्याही रॅकेटशी संबंध असल्याचे नाकारले.
यानंतर ती अनेक वर्षे अज्ञात राहिली. त्यानंतर ती २०१४ मध्ये तिच्या लाईफवर आधारित ऑटोबायोग्राफी बाय योगिनी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान दिसली. यावेळी तिचा लुक पाहून प्रत्येकजण हैराण होता. साध्वीसारखा भगवा ड्रेस घालून माथ्यावर टीका लावलेली ममता कोणाला ओळखता देखील आली नाही आणि तेव्हा खुलासा झाला कि ती साध्वी बनली आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.