बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या कामामुळे कमी आणि स्टाईल आणि फिटनेसमुळे जास्त चर्चेमध्ये राहते. मलायका आपल्या फिटनेसमुळे खूपच सतर्क राहते. मलायकाला नेहमी वर्कआउट सेशननंतर स्पॉट केले जाते. तथापि तिला अनेकवेळेला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे, यावेळी देखील मलायकासोबत असेच झाले.
मलायका अरोरा बॉलीवूडमधील सर्वात स्टायलिश आणि फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. ४९ वर्षीय मलायकाच्या फिटनेससमोर तिच्या निम्म्या वयाच्या मुलीही फिक्या पडतात. अनेकवेळेला मलायका तिच्या वर्कआउट सेशननंतर पाहायला मिळत असते. प्रत्येकवेळी ती कुल जिम वेअरमध्ये तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसते.
तथापि अनेकवेळा मलायकाला तिच्या लुकमुळे ट्रोलदेखील केले जाते. असो, पुन्हा एकदा मलायकाला तिच्या फिटनेस क्लासेसच्या बाहेर स्पॉट केले गेले आणि पॅप्सनी तिला घेरले. मलायकाने व्हाईट स्लीवलेस टी-शर्ट सोबत ब्लॅक शॉर्ट्स घातली होती. नो मेकअप लुकमध्ये देखील ती खूपच सुंदर दिसत होती. तथापि इथे देखील नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही.
मलायका अरोरा पुन्हा पुन्हा आपला चेहरा टोपीने लावण्याचा पर्यंत करत होती. अशामध्ये तिचे फोटो सोशल मिडियावर समोर आले तर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एक सोशल मिडिया युजरने मलायका अरोराच्या या फोटोवर कमेंट करत लिहिले कि, असे कपडे घालायचेच कशाला ज्यामुळे तोंड लपवण्याची वेळ येते.
View this post on Instagram