आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आईवडील बनणार आहेत. आधी लग्न आणि नंतर दोन महिन्यामध्येच आलिया भट्टने प्रेग्नंसीची घोषणा करून सर्वांनाच शॉक दिला होता. आता आलिया तिच्या बेबी बंप फ्लॉन्ट करण्यामुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. आलिया आणि रणबीरचा चित्रपट ब्रह्मास्त्रचे गाणे देवा देवा लॉन्च होण्यापूर्वी दोघे एकत्र कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. यानंतर आलियाने आपले सिंगल फोटो बेबी बंप फ्लॉन्ट करत शेयर केला आहे. ज्यावर मलायका अरोराने अशी कमेंट केली आहे कि ती सध्या खूपच व्हायरल होत आहे.

आलिया भट्टने या प्रसंगी रणबीर कपूरसोबत कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोज दिल्या. या प्रसंगी रणबीरने ब्लॅक शर्टसोबत ब्लॅक जीन्स तर आलियाने ब्राउन कलरचा वन-पीस परिधान केला होता. आलियाचा हा शॉर्ट ड्रेस खूपच फिटिंग होता. ज्यामध्ये आलियाचे बेबी बंप स्पष्ट दिसत होते.

यासोबत आलियाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसत होता. यादरम्यान आलियाने फोटो शेयर केल्यानंतर मलायका अरोरा त्यावर कमेंट करण्यास स्वतःला आवरू शकली नाही. मलायकाने आलिया भट्टच्या बेबी बंपला पाहून अशी गोष्ट म्हणली आहे कि तिची कमेंट सध्या खूपच व्हायरल होत आहे.

मलायकाने फोटोवर कमेंट करताना लिहिले आहे कि तुला बेबी बंप सूट करत आहे, यासोबत दुसऱ्या कमेंटमध्ये तिने हृदयाचा आयकॉन शेअर केला आहे. मलायकाशिवाय इतर अनेक कलाकारांनी देखील आलियाच्या ड्रेसिंग सेन्सवर आणि तिच्या बेबी बंपवर कमेंट केल्या आहेत. नीना गुप्ताने लिहिले आहे कि प्रेग्नंसीमध्ये तुझ्या कपड्यांची निवड खूपच उत्तम आहे.