अरबाज खान आणि मलाइका अरोरा दोघांनी विवाहित आयुष्याची १९ वर्षे एकत्र घालवल्यानंतर घटस्फोट घेऊन वेगळे झाले. लग्नाच्या अगोदर देखील ते अनेक वर्षे रिलेशनमध्ये राहिले होते. म्हणजे जवळ जवळ दोघांनी २५ वर्षे एकत्र घालवली. अशामध्ये या नात्याला तोडणे मलायका आणि अरबाज दोघांसाठी सोपे नव्हते.

पण अनेकवेळा आयुष्यामध्ये असे वळण देखील येते कि प्रेमाने जोडलेले नाते द्वेष आणि रागाने तोडावे लागते. यांच्यासोबत देखील तसेच झाले. दोघांनी हे नाते वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण जे व्हायचे होते तेच झाले. जितकी चर्चा त्यांच्या घटस्फोटाची होते तितकीच त्यांची लव्ह स्टोरी देखील खूप सुंदर आहे. असे म्हंटले जाते कि मलायका त्यावेळी अरबाजच्या प्रेमात इतकी पागल झाली होती कि तिने स्वत:च अरबाजला लग्नासाठी प्रपोज केले होते.

दोघांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शुटींग दरम्यान झाली होती. ज्यामध्ये दोघेही मुख्य भूमिकेमध्ये होते. मलायकाच्या सौंदर्यावर अरबाज देखील लट्टू झाला होता आणि अरबाजच्या पर्सनॅलिटीवर मलायका फिदा झाली होती. शेवटी दोघांनी एकमेकांना डेत करायला सुरुवात केली. दोघांचे अफेयर ५ वर्षे सुरु होते. अरबाजला चांगल्याप्रकारे ओळखल्यानंतर मलायकाने त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नासाठी त्याला प्रपोज केले.

अरबाजने जसे मलायकाकडून लग्नाचे प्रपोजल ऐकले त्याने कोणताही विचार न करता लगेच होकार दिला. त्यावेळी अरबाजने फक्त इतकेच म्हंटले होते कि डेट आणि व्हेन्यू तू डिसाईड कर मी तिथे हजर असेन. शेवटी दोघांच्या कुटुंबाच्या संमतीने विवाहबंधनामध्ये अडकले. १९९८ मध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम रितीरिवाजानुसार दोघांनी लग्न केले होते.