मलायका अरोराने चक्क ट्रोल करणाऱ्यांचीच उडवली खिल्ली, म्हणाली; माझ्याबद्दल बोलण्यासाठी काही नवीन…

By Viraltm Team

Published on:

अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड आणि बॉलीवूडची मुन्नी मलायका अरोरा ४९ व्या वर्षी देखील खूप फिट आहे आणि आपल्या लुकसाठी ती खूपच पर्टिक्युलर देखील असते. मलायका अशा अभिनेत्रींपैकी आहे जिला सोशल मिडियावर प्रत्येक गोष्टीसाठी ट्रोल केले जाते.

मलायकाचे चालणे असो किंवा बोलणे, पर्सनल लाईफ असो किंवा प्रोफेशनल तिच्या प्रत्येक अंदाजासाठी तिला ट्रोल केले जाते. अशामध्ये मलायकाने एक नवीन व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम पेजवरून शेयर केला आहे, जो खास तिच्या हेटर्स आणि ट्रोलर्ससाठी आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाने स्वतःच आपल्या ट्रोलर्सला ट्रोल केले आहे आणि त्यांना रिक्वेस्ट केली आहे कि आता तिची एखाद्या नवीन गोष्टीवरून खिल्ली उडवावी.

मलायकाने सोशल मिडियावरून जो व्हिडीओ शेयर केला आहे त्यामध्ये ती आपल्या ट्रोलर्सची चांगलीच खिल्ली उडवत आहे आणि खूप काही त्यांना बोलत देखिला हे. मलायका म्हणते कि ती जे काही करते त्यावरून तिला ट्रोल केले जाते.

प्रत्येक गोष्टीसाठी तिची खिल्ली उडवली जाते, मग ते कपडे असो, घटस्फोट असो, नातेसंबंध असो, तिचे चालणे असो, बिकिनी लुक किंवा ईवनिंग गाउन. मलायका म्हणते कि आता या गोष्टी खूपच जुन्या झाल्या आहेत आणि ती देखील आता यावरून खूपच बोर झाली आहे.

व्हिडीओमध्ये मलायका म्हणते कि आता तिला या गोष्टींचा कंटाळा आला असल्याने, सोशल मिडिया युजर्सनी तिला ट्रोल करण्यासाठी, तिच्याबद्दल बोलण्यासाठी एक नवीन विषय शोधून काढावा. अशामध्ये मलायकाने म्हंटले कि ती स्वतःच आता लोकांना काहीतरी नवीन देणार आहे, ज्यावर ते आरामात बोलू शकतात. वास्तविक मलायका आपली नवीन रियालिटी सिरीज मूव्हिंग इन विथ मलायका’चे प्रमोशन करत आहे आणि या शोचा पहिला प्रोमो आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

Leave a Comment