मलायका अरोराच्या फॅशन सेंस आणि स्टाईलचे लाखो दिवाने आहेत. पण असे वाटते कि मुलगा अरहानला त्याच्या आईचा ड्रेसिंग सेंस खास पसंद नाही. तेव्हाच अभिनेत्रीच्या मुव्हिंग इन विथ मलायका रियालिटी शोमध्ये अरहानने आईच्या ड्रेसिंग सेंसची खिल्ली उडवली. अरहानने मलायकाच्या स्टायलिश आउटफिटची टेबल नॅपकिनशी तुलना केली.
मलायका सोबत अरहानची हि मजेशीर धमाल युजर्सना पसंद येत आहे. ज्याप्रकारे अरहान शोमध्ये आईची खिल्ली उडवताना दिसत हे, यावरून लोकांना त्यांचा खास बॉन्ड दिसून येत आहे. मुव्हिंग इन विथ मलायकाच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अभिनेत्रीने खूपच ग्लॅमरस टॉप घातला होता. मलायकाने याला पँटसोबत कॅरी केले होते.
आईला पाहून अरहान तिची खिल्ली उडवायला जरासुद्धा मागेपुढे पाहिले नाही. अरहान आईच्या आउटफिटची तुलना टेबल नॅपकिनशी करतो आणि म्हणतो कि तू एखाद्या जेलमधील कैद्यासारखी दिसत आहेस. मुलाच्या या वक्तव्यावर मलायका काहीच प्रतिक्रिया देऊ शकली नाही आणि फक्त हसू लागली.
शोमध्ये अरहानने खुलासा केला कि तो त्याची मावशी अमृता अरोरासोबत त्याचे चांगले संबंध आहेत. अरहानने अमृतालला आपली दुसरी आई सांगितले. अरहानने म्हंटले कि, मी अमूसाठी बायस्ड आहे. ती तुझ्या पोजिशनवर येनासाठी नेहमी स्वतःला पुश करत असते. ती माझ्या दुसऱ्या आईसारखी आहे, पण आता मला असे वाटते कि ती पहिल्या पोजिशनवर आली आहे.
अरहान आणि अमृताची जबरदस्त बॉन्डिंग आहे. ते एकत्र खूप धमाल करत असतात. अरहान अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोराचा मुलगा आहे. मलायका अरबाजचा घटस्फोट झाला असला तरी ते मुलासाठी एकत्र येण्यास कधीच मागेपुढे बघत नाहीत. अरहान यूएसमध्ये फिल्ममेकिंगचे शिक्षण घेत आहे. सध्या तो भारतामध्ये आला आहे. अरहान आपल्या किलर लुकमुळे चाहत्यांमध्ये फेवरेट आहे. खान कुटुंबामध्ये तो सर्वांचा लाडका आहे.
मलायकाच्या शोबद्दल बोलायचे झाले तर ती आपल्या पर्सनल लाईफमधील खुलास्यामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. मलायकाबद्दल पहिल्यांदाच इतक्या गोष्टी चाहत्यांना जाणून घेता येत आहेत. जे याआधी चाहत्यांसाठी प्रश्न बनले होते. मुव्हिंग इन विथ मलायका शो चाहत्यांना खूप उत्सुक करत आहे. शोमध्ये अभिनेत्रीचा नो फिल्टर साइड पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram