अखेर मलायका अर्जुन कपूरसोबत लग्नासाठी झाली तयार, इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करून दिला होकार…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत, पण आता असे वाटते आहे कि फायनली दोघे लग्न करण्याची तयारी करत आहेत. मलायका अरोराने आज इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर करून याची पुष्टी केली आहे.

मलायका अरोराने एक सुंदर फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये ती हसताना खूपच क्युट दिसत आहे. पण सर्वांचे लक्ष तिने लिहिलेल्या कॅप्शनकडे वेधले गेले आहे. ज्यामध्ये तिने काही लिहिले आहे. मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, मी हो म्हणले… आणि त्यानंतर तिने तीन डबल हार्ट वाले इमोजी बनवले आहेत.

मलायकाने पोस्ट शेयर करताच तिची पोस्ट सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाली आहे. लोक तिच्या पोस्टवर कमेंट आणि लाईक करायला थकत नाही आहेत. चाहते आणि सेलेब्स तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

दोघांचे लग्न कधी आहे याबद्दल अजून काही स्पष्ट झालेले नाही पण बातमीनुसार या वर्षाच्या डिसेंबरमध्ये हे कपल विवाह बंधनामध्ये अडकू शकते. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने आपल्या नात्याला लोकांपासून कधीच लपवले नाही.

ते नेहमी रोमँटिक फोटो सोशल मिडियावर शेयर करत राहतात. नुकतेच जेव्हा दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या तेव्हा अर्जुन कपूरने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर करून हि फक्त एक अफवा असल्याचे सांगितले होते. चाहत्यांसोबत सेलेब्स देखील आता अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाची वाट पाहत आहेत. चाहते त्यांना वर आणि वधूच्या वेषामध्ये पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

Leave a Comment