मलायका अरोरा एक अशी सेलिब्रिटी आहे जिच्याबद्दल नेहमी कोणत्याना कोणत्या चर्चा होत राहतात. खासकरून ती तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळे खूपच चर्चेमध्ये राहते. मलायकाची लोकप्रियता पाहता डिज्नी प्लस हॉटस्टारने तिच्यावरच एक शो बनवला आहे. मूव्हिंग इन विथ मलायका या नावाच्या शोचा पहिला एपिसोड नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेत्री फरह खानसोबत आपल्या पर्णल लाईफमधील गुपिते उघड करताना दिसली.
मलायकाने सांगितले कि हा शो करण्यासाठी तिचा मुलगा अरहान आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने खूप सपोर्ट केला. अभिनेत्री जेव्हा देखील लाईफमधील मोठे डीसीजन घेते तेव्हा ती या दोघांचा सल्ला अवश्य घेते. मलायका अरबाज खानला घटस्फोट दिल्यापासून अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये आहे. या दोघांच्या लग्नाबद्दल आतापर्यंत अनेकवेळा अफवा उडाल्या आहेत. पण दोघे खर्च लग्न करणार का ? जर होय तर मग कधी ? याचा खुलासा स्वतः मलायकानेच केला.
अर्जुन कपूर वयाने मलायकापेक्षा १२ वर्षाने मोठा आहे. अशामध्ये फराह खानने अभिनेत्रीला विचारले कि तुला लहान वयाच्या व्यक्तीला डेट करायला कोणत्या अडचणी येतात ? फराहने आपला अनुभव शेयर करत सांगितले कि जेव्हा मी ८ वर्षाने लहान (शिरीष कुंदर) व्यक्तीसोबत लग्न केले होते तेव्हा मला खूप काही ऐकून घ्यावे लागले होते. तेव्हा तुला पण लोक असे काही म्हणतात का, तू हे काय करत आहेस, तू ठीक तर आहेस ना ?
या प्रश्नावर मलायका म्हणाली, नक्कीच हे सोपे नव्हते, मी रोज अशाप्रकारचे ऐकून घेते. अरे तू तर वयाने मोठी आहेस, मग छोट्या वयाच्या व्याकीला का डेट करतेस ? मग पुरुष जर स्वतः पेक्षा २०-३० वर्षाने मुलीला डेट करत असतील तर त्यांचे कौतुक केले जाते. त्यांना अशी जाणीव करून दिली जाते कि तो एखादा राजा आहे. मग एखाद्या स्त्रीने असे केले तर तिची खिल्ली उडवली जाते. त्यांच्या जोडीला आई आणि मुलाची जोडी म्हंटले जाते. बाहेरचेच नाही तर माझ्या जवळच्यांनी देखील मला असे म्हंटले आहे. यामुळे आणखीन दुख होते.
फराह खानने मलायकाला भविष्यातील प्लानबद्दल देखील प्रश्न विचारले. तिने म्हंटले कि तुझा फ्यूचर प्लान काय आहे ? तुला पुन्हा लग्न करायचे आहे का ? पुन्ह मुल हवे आहे का ? यावर मलायका म्हणाली कि, हे बघ हे सर्व काल्पनिक आहे. आपण आपल्या पार्टनरसोबत अशा गोष्टी करतो. आम्ही देखील केल्या आहेत. माझ्या मते जेव्हा मी एका रिलेशनशिप असते तेव्हा एक चांगली व्यक्ती असते. मलायका पुढे म्हणाली कि मी माझ्या लाईफमध्ये जे काही निर्णय घेतले आहेत ते यामुळे कि मी स्वतःला आनंदी पाहू इच्छिते. आज जी व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आहे ती मला नेहमी आनंदी ठेवते. आता यासाठी जग काय म्हणते मला याची पर्वा नाही.
मलायकाने यावर उत्तर देत स्पष्ट केले कि ती सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये आनंदी आहे. यामुळे तिचा सध्या लग्नाचा कोणताही प्लान नाही. दुसरीकडे स्वतः अर्जुनने देखील कॉफी विथ करण’मध्ये स्पष्ट केले आहे की, त्याला सध्या आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे.