मकर संक्रांतीचा सण लवकरच येणार आहे जो येत्या १५ जानेवारीला साजरा होणार आहे. या दिवशी सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो. यावेळी संक्रांतीचे उपवाहन मेष आहे. या दिवशी गंगा स्नान करून व्रत, कथा, दान आणि भगवान सूर्यदेवाची उपसना करण्याचे विशेष महत्व आहे. पण त्याचबरोबर जर राशीनुसार दानधर्म केल्यास त्यामुळे जीवनामध्ये सकारात्मकता येते आणि शुभ संकेत मिळू लागतात. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल.

मेष :- मेष राशींच्या लोकांनी पाण्यामध्ये पिवळी फुले, हळद, तीळ मिसळून ते सूर्याला अर्पण करावे. या दिवशी मेष राशींच्या लोकांनी तीळ आणि गुळ दान केल्यास लाभ मिळेल. कार्यक्षेत्रामध्ये उच्च स्थान प्राप्त होईल.

वृषभ :- पाण्यामध्ये पांढरे चंदन, दुध, श्वेत पुष्प, तीळ मिसळून ते सूर्याला अर्पण करावे. या काळामध्ये एखादी मोठी जबाबदारी मिळण्याचे योग बनत आहेत. नवीन महत्वपूर्ण योजना सुरु होण्याची शक्यता आहे.मिथुन :- पाण्यामध्ये तीळ, दुर्वा आणि फुले मिसळून सूर्याला अर्पण करावे. गायीला हिरवा चारा द्यावा. या दिवशी मिथुन राशींच्या लोकांनी मुग डाळीची खिचडी दान करावी लाभ मिळेल. ऐश्वर्य-संपन्नता प्राप्त होईल.

कर्क :- पाण्यामध्ये दुध, तांदूळ, तीळ मिसळून सूर्याला अर्पण करावे. या दिवशी तांदूळ, साखर, तीळ दान करावे. वादविवाद आणि संघर्ष शांत होतील.

सिंह :- पाण्यामध्ये कुंकू अथवा लाल फुले, तीळ मिसळून सूर्याला अर्पण करावे. तीळ, गुळ, गहू, सोने दान करावे. मोठी कामे मार्गी लागतील.

कन्या :- पाण्यामध्ये तील, दुर्वा, फुले मिसळून सूर्याला अर्पण करावे. मुग डाळीची खिचडी दान करावी. गायीला चारा खाऊ घालावा. एखादी चांगली बातमी मिळेल.तुला :- पाण्यामध्ये पांढरे चंदन, दुध, तांदूळ, तीळ मिसळून सूर्याला अर्पण करावे. या दिवशी तांदूळ दान करावे. व्यवसायामध्ये बाह्य संबंधांतून लाभ मिळेल आणि शत्रू अनुकूल होतील.

वृश्चिक :- पाण्यामध्ये कुंकू अथवा लाल फुले, तीळ मिसळून सूर्याला अर्पण करावे. गुळ दान करावे. परदेशातील कामे मार्गी लागतील आणि परदेश यात्रा होतील.

धनु :- पाण्यामध्ये हळद, केसर, पिवळी फुले मिसळून सूर्याला अर्पण करावे. सर्व कामामध्ये सफलता मिळेल.

मकर :- पाण्यामध्ये काळी-निळी फुले, तीळ मिसळून सूर्याला अर्पण करावे. गरीब-अपंगांना भोजन द्यावे. तुम्हाला तुमचे सर्व अधिकार प्राप्त होतील.

कुंभ :- पाण्यामध्ये काळी-निळी फुले, काळी उडीद, मोहरीचे तेल आणि तीळ मिसळून सूर्याला अर्पण करावे. तेल आणि तीळ दान करावे. तुमच्या विरोधकांचा पराभव होईल. अप्तेष्ठांच्या भेटी-गाठी होतील.मीन :- पाण्यामध्ये हळद, केसर, पिवळे फुल, तीळ मिसळून सूर्याला अर्पण करावे. मोहरी, केशर दान करावे. समाजामध्ये मान-सन्मान वाढेल. सर्व कामांमध्ये सफलता मिळेल.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.