भारतीय क्रिकेटर्स आणि बॉलीवूड अभिनेत्रींचे नेहमी एकमेकांसोबत एक कनेक्शन राहिले आहे. विराट कोहली आणि युवराज सिंह पासून ते हरभजन सिंह आणि जहीर खान पर्यंत असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी बॉलीवूड अभिनेत्रींसोबत लग्न केले आहे.
इतर अनेक अभिनेत्रींचे नाव देखील भारतीय खेळाडूंसोबत जोडले गेले आहे आणि यामधीलच एक भारतीय क्रिकेट टीमचा पूर्व कप्तान महेंद्रसिंग धोनी आहे. धोनी भलेहि नेहमी क्रिकेटशी जोडला गेला आहे पण अनेकवेळा त्याचे नाव बॉलीवूड अभिनेत्रींसोबत देखील जोडले गेले. धोनी आणि त्याची पत्नी साक्षीला आज एक मुलगी जीवा आहे. पण लग्नाच्या अगोदर त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत संबंध राहिले.
दीपिका पादुकोण: महेंद्रसिंग धोनीचे नाव सर्वात जास्त बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सोबत जोडले गेले. माहितीनुसार दीपिका पादुकोणवर एम एस धोनी फिदा होता. त्यावेळी दीपिकाचे नाव युवराज सिंहसोबत जोडले गेले जाऊ लागले त्यामुळे त्यानंतर त्याने दीपिकाकडे दुर्लक्ष केले.
दीपिकाने २००७ मध्ये ओम शांति ओम चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती आणि त्याचवर्षी एम एस धोनीने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता त्याला दीपिकावर क्रश आहे. त्यानंतर एकदा दीपिकाला भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या टी-२० सामन्यामध्ये देखील महेंद्रसिंग धोनीला चीयर करताना दिली होती. धोनी आणि दीपिकाने कधी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला नाही.
प्रीति सिमोस: तुम्हाला हे तर नक्कीच माहिती असेल कि दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीचे नाव टीवी प्रोड्यूसर आणि कॉमेडी नाइट्स विद कपिल सारख्या हिट शोची क्रिएटिव प्रीति सिमोससोबत देखील जोडले गेले आहे. हे दोघे गेल्या १६ वर्षांपासून एकमेकांचा चांगले मित्र आहेत. ज्यामुळे धोनीचे नाव प्रीतीसोबत जोडले गेले.
असिन: गजनी चित्रपटाची अभिनेत्री असीनला तुम्ही चांगलेच ओळखत असाल. असीनसोबत देखील महेंद्रसिंग धोनीचे नाव जोडले गेले. दोघांचे अफेयर असल्याच्या देखील चर्चा झाल्या होत्या. दोघे एका क्लॉथिंग ब्रांडचे अँबेसडर होते आणि यादरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले होते.
माहितीनुसार २०१० मध्ये धोनी एका असीनच्या घरी देखील जाताना दिसला होता. त्याच वर्षी असीन आणि धोनी वेगळे झाले आणि नंतर धोनीने जुलै २०१० मध्ये साक्षीसोबत लग्न केले होते. लग्नानंतर देखील बरेच दिवस धोनी आणि असीनच्या अफेयरच्या बातम्या समोर आल्या होत्या.
राय लक्ष्मी: २००८ मध्ये महेंद्रसिंग धोनीचे नाव प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडल राय लक्ष्मी सोबत देखील जोडले गेले होते. दोघे नेहमी पार्टीमध्ये एकत्र पाहायला मिळत असत. असे म्हंटले जात होते कि २००९ मध्ये धोनी आणि राय लक्ष्मीचे ब्रेकअप झाले होते.