आपल्या एका हास्याने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री हेमा मालिनी सोशल मिडियावर नेहमी सक्रीय असते. माधुरी नेहमी आपल्या चाहत्यांसोबत कुटुंबासोबतचे आणि चित्रपटांशी संबंधित फोटो शेयर करत असते. चाहते देखील तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडत असतात. पण आज आपण माधुरीबद्दल नाही तर तिच्या बहिणींबदल जाणून घेणार आहोत.
तुम्हाला कदाचित माहिती नसेल कि माधुरीला दोन बहिणी आहेत ज्यांची नावे रूपा दीक्षित आणि भारती दीक्षित अशी आहेत. त्याचबरोबर एक भाऊ देखील आहे ज्याचे नाव अजित दीक्षित आहे. माधुरीचा स्टारडम इतका जास्त आहे कि कधी तिच्या पर्सनल लाईफवर लोकांचे लक्ष गेलेच नाही.
कधी कोणी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही कि माधुरीच्या कुटुंबामध्ये कोणकोण आहेत. माधुरीच्या वडिलांचे नाव शंकर दीक्षित आणि आईचे नाव स्नेहलता दीक्षित आहे. माधुरीला अभिनेत्री बनवण्यामध्ये तिच्या कुटुंबाचा मोठा हात आहे.
सिल्वर स्क्रीनवर भलेहि माधुरी बहरलेली असते पण पडद्याच्या मागे माधुरीच्या बहिणी तिचा सपोर्ट सिस्टम होत्या. माधुरीच्या बहिणी देखील ट्रेंड कथक डांसर आहेत पण माधुरीला अभिनेत्री बनवण्यासाठी त्यांनी कधीच बॉलीवूडमध्ये संधी शोधली नाही.
माधुरीच्या बहिणी रूपा आणि भारती आता सेटल झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल जास्त माहिती आता उपलब्ध नाही. कधी कधी तिघी फोटोंमध्ये एकत्र पाहायला देखील मिळाल्या आहेत. फोटोंमध्ये तिघींची बॉन्डिंग स्पष्टपणे पाहायला मिळते.
माधुरीबद्दल बोलायचे झाले तर तिला बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी जास्त स्ट्रगल करावे लागले नाही. याचा खुलासा माधुरीने एका मुलाखतीदरम्यान केला आहे. माधुरी म्हणाली होती कि मी कधी विचार देखील केला नव्हता कि मी अभिनेत्री बनेन. मला जास्त स्ट्रगल देखील करावा लागला नाही. तुम्ही असे म्हणू शकता कि चित्रपट स्वतःहून माझ्याकडे आले आहेत.