माधुरी दीक्षितच्या आईचे निधन, ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

By Viraltm Team

Published on:

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर बॉलीवूडमधून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माधुरी दीक्षितची आई स्नेहलता देशमुख यांचे निधन झाले आहे. आईच्या निधनानंतर माधुरी पूर्णपणे खचली आहे.

माधुरी दीक्षितच्या आईचे निधन आज म्हणजेच १२ मार्च २०२३ च्या सकाळी जवळ जवळ ८.४० मिनिटांनी झाले. अभिनेत्रीची आई ९१ वर्षाची होती. मुंबईच्या वरळीमध्ये आज दुपारी जवळ जळव ३-४ वाजता तिच्या आईवर अंतिम संस्कार होणार आहेत. माधुरी दीक्षित तिच्या आईच्या जाण्यामुळे खूपच दुखी झाली आहे.

माधुरी दीक्षित गेल्या वर्षी जूनमध्ये तिच्या आईचा ९० वा वाढदिवस साजरा केला होता आणि आपल्या आईच्या बर्थडे सेलेब्रेशनचे फोटो तिने सोशल मिडियावर शेयर केले होते. आपल्या आईच्या आठवणी शेयर करत अभिनेत्रीने लिहिले होते कि वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. असे म्हंटले जाते कि आई हि मुलीची सर्वात बेस्ट मैत्रीण असते. ते योग्यच आहे. तू माझ्यासाठी जे काही केले आहे, तू दिलेली शिकवण माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. मी तुमच्या आरोग्य आणि आनंदासाठी कामना करते.
माधुरी दीक्षितच्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांम्ध्ज्ये तिच्या आईने तिला खूप सपोर्ट केला होता. चित्रपटाचे शुटींग असो किंवा एखादा इवेंट असो. तिची आई नेहमी तिच्यासोबत असायची. अभिनेत्रीने अनेकवेळ सांगितले आहे कि स्टार असून देखील एक सामान्य आयुष्य जगण्यामध्ये तिच्या आईची महत्वपूर्ण भूमिका आहे. तिच्या आईने तिला नेहमी साधारण राहायला शिकवले.

Leave a Comment