बॉलीवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे चाहते तिच्या अभिनयावरच नाही तर तिच्या डांसिंग, एक्सप्रेशन्स, स्टाईल आणि लुक्सवर देखील फिदा आहेत. जेव्हा ती कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा लोक तिच्यावरून नजर हटवूच शकत नाहीत. आता पुन्हा एकदा मधुरीच्या अदांनी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.
माधुरी गेल्या काही काळापासून कमीच प्रोजेक्ट्समध्ये दिसत आहे, पण या कारणामुळे तिच्या चाहत्यांमध्येच कमी आलेली नाही. आज देखील लोक तिच्या लुकवर फिदा आहेत. अभिनेत्री देखील आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी कोणतीना कोणती संधी शोधत असते. सध्या ती सोशल मिडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात आहे. अशादरम्यान तिचा स्टायलिश लुक देखील पाहायला मिळतो.
माधुरीने पुन्हा एकदा आपले ग्लॅमरस फोटोशूट केले आहे, ज्याची झलक देखील अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना दाखवली आहे. या फोटोंमध्ये माधुरीला ब्रॉडनेक स्ट्राइप गाऊन घातलेली पाहू शकता. अभिनेत्रीने आपल्या या लुकला ग्लॉसी ब्राइनिश मेकअपने कंप्लीट केले आहे.
यासोबत तिने केसांना वेवी टच देऊन ओपन ठेवले आहे. या फोटोजमध्ये अभिनेत्री माधुरी दिक्षित खूपच ग्लॅमरस आणि हॉट पाहायला मिळत आहे. तिला पाहून हा अंदाज लावला जाऊ शकत नाही कि ती ५५ वर्षाची झाली आहे.
माधुरी दिक्षितच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती झलक दिखला जा १० या डांस रियालिटी शोमध्ये जजची खुर्ची सांभाळताना पाहायला मिळत आहे. याशिवाय ती आपल्या मजा मा या अपकमिंग चित्रपटामुळे देखील खूप चर्चेमध्ये आहे. तिचा हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात येणार आहे.
View this post on Instagram