भारतीय चित्रपट जगतात कधी एक काळ असा होता जेव्हा महिलांनी बाहेर काम करणे चुकीचे मानले जात असे. पूर्वीच्या काळामध्ये चित्रपटाच्या जादुई दुनियेमध्ये फार कमी स्त्रिया आपले कर्तृत्व दाखवू शकत होत्या. तरी आता वेळ बदलली आणि आता एका पेक्षा एक अभिनेत्री चित्रपटांमध्ये नाव कमावत आहेत. अशातच जर इतिहासामध्ये मागे पाहाल तर, असे दिसेल की ५०-६० च्या दशकामध्ये एक अभिनेत्री अशी होती की, जी तिच्या कमावणे तसेच वैवाहिक जीवन आणि दमदार शैलीसाठी प्रसिद्ध होती. या अभिनेत्रीचे नाव होते फ्लोरेंस एजेकील.
हिंदी चित्रपटांमध्ये अनेक एग्लो इंडियन्स नि काम केले आहे. फ्लोरेंस देखील त्यातीलच एक होती. फ्लोरेंस एजोकील ला इंडस्ट्री मध्ये नादिरा च्या नावाने ओळखले जात होते. सांगितले जाते की हे नाव तिला महबूब खान ने दिले होते. नादिरा ने तिच्या संपूर्ण चित्रपट करिअर मध्ये जवळपास २५० चित्रपटांमध्ये काम केले आहे. अगदी लहान वयातच चित्रपट जगतात वळली होती. मिडिया रिपोर्ट नुसार, श्रीमती महबूब खान ने तिला ‘आन’ चित्रपटातून ब्रेक दिला. पहिल्या चित्रपटामध्ये दिलीप कुमार आणि प्रेमनाथ सारख्या दिगज्ज कलाकरांच्या सोबत काम करून तिने तिच्या अभिनयाची जादू पडद्यावर दाखवली होती.
नादिरा ने अनेक चित्रपटांमध्ये काम केले परंतु तिला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली ती ‘मूड मूड के ना देख’ गाण्या पासून. हे गाणे होते राज कपूर चा चित्रपट ‘श्री ४२०’ मधील. तथापि, हा चित्रपट तिच्या साठी नंतर डोकेदुखी ठरला. प्रत्यक्षात, चित्रपटामध्ये तिने खलनायकाची भूमिका केली होती. या चित्रपटामध्ये तिची सिगरेट पकडण्याची स्टाईल खूप पसंत केली जात होती. नादिरा बॉलीवूड मधील पहिली अभिनेत्री होती जिने खलनायकाची भूमिका केली होती.
हातामध्ये सिगरेट, धारदार चेहरा, गडद मेकअप आणि फैशनेबल ड्रेस मध्ये दिसनारी नादिराची व्यक्तिरेखा एवढी पसंत केली गेली की नंतर तिला नायिकेच्या भूमिका मिळणे बंद झाले. ‘श्री ४२०’ च्या नंतर तिच्या जवळ हिरोईन च्या ऑफर येणे बंद झाले. जवळपास एक वर्षापर्यंत तिला हिरोईनच्या भूमिकेतील काम मिळाले नाही.
नादिरा च्या व्यावसायिक जीवनात खूप चढउतार होते तेवढेच चढउतार तिच्या खऱ्या आयुष्यात देखील होते. तिने दोन लग्ने केली होती. पहिले लग्न शायर नख्शाब सोबत केले होते. सांगितले जाते की लग्नानंतर नख्शाब निर्माता बनला आणि नादिरा ला ‘नगमा’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी तयार केले. परंतु त्याच्या दुटप्पी वागण्यामुळे हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. रिपोर्ट च्या माहितीनुसार नख्शाब नादिरा ला चित्रपटाच्या पोस्टर साठी बोर्ड पोज देण्यासाठी सांगत असे, तर घरी तिला बुर्ख्यामध्ये झाकलेले त्याला पसंत होते.
नादिरा च्या साठी सांगितले जाते की तिला कायम एक शाही जीवन जगणे पसंत होते. तिचे यश वाढत चालले होते आणि पगारात देखील वाढ होत होती. हेच कारण आहे की तिने तिच्या छंदात त्या वेळची सर्वात महागडी गाडी रोल्स रॉयस खरेदी केली होती. एवढी महागडी गाडी खरेदी करणारी ती पहिली अभिनेत्री होती. असे देखील सांगितले जाते की तिच्या शेवटच्या क्षणी तिच्या सोबत कोणीही नव्हते, फक्त तिची काळजी घेणारी होती. नादिरा चे निधन फेब्रुवारी २००६ मध्ये एका मोठ्या आजारपणामुळे झाले होते.
Tribute to NADIRA
(5 Dec 1932 – 9 Feb 2006)born as Florence Ezekiel in a Baghdadi Jewish family.
“She reigned supreme as the vamp or temptress. Despite sucessful career over 50 yrs, she led a lonely life. From heady fame to isolation, Nadira’s life was indeed ‘Ajeeb Dastaan’”. pic.twitter.com/IewNG9TnQc
— Film History Pics (@FilmHistoryPic) February 9, 2020