बॉलीवूड हादरले ! ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचे नि’धन, भावुक पोस्ट शेयर करत दिली माहिती…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमूच्या आजीचे निधन झाले आहे. याची माहिती त्याने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरून दिली. कुणाल त्याच्या आजीच्या खूप जवळ होता. यामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर करून आपल्या दिवगंत आजीच्या आठवणीत भावुक झाला आहे.

या फोटोमध्ये त्याची मुलगी इनाया देखील पाहायला मिळत आहे. पोस्ट शेयर करताना त्याने भावुक करणारी नोट देखील लिहिली आहे. रविवारी कुणालच्या आजीचे निधन झाले. फोटो शेयर करताना त्याने लिहिले आहे कि, मी आज माझ्या आजीला गमावले. आम्ही सर्वजण तिला माजी म्हणत होतो. तिने हे नाव वास्तवामध्ये कमवले आहे.

ती एका आईप्रमाणे आमच्यावर प्रेम करत होती आणि आम्ही जेव्हा देखील तिच्यासोबत होतो तेव्हा ती आम्हाला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. माझ्याजवळ तिच्या अनेक अद्भुत आठवणी आहेत. ती मला गोष्टी सांगायची, मला जेवण भरवायची, मला खेळवायची आणि माझी काळजी घ्यायची.

तिने माझ्यासाठी अशा गोष्टी खरेदी केल्या ज्यासाठी माझे आईवडील मला अनुमती देत नव्हते. ती मला नेहमी स्वतःवर विश्वास ठेवण्यासाचा सल्ला देत होती. त्याने पुढे लिहिले आहे कि, ती माझ्यासाठी सर्वात मोठी चियरलीडर होती. ती माझ्यासाठी शक्ती, करुणा आणि प्रेमाचे प्रतिक होती. मला आठवत नाही कि मी कधी तिला रडताना पाहिले आहे. मी नेहमी तिला कामामध्ये व्यस्त असताना पाहिले. तुला नेहमीच मिस करेन.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)

कुणाल लूटकेस चित्रपटामध्ये शेवटचा दिसला होता. या चित्रपटामध्ये त्याच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते. याशिवाय त्याच्याजवळ अपकमिंग चित्रपट देखील आहेत. तो विपुल मेहताच्या कंजूस मक्खीचूस चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत श्वेता त्रिपाठी आणि पीयूष मिश्रा देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

Leave a Comment