आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल रशीद खान उर्फ केआरके नेहमी बॉलीवूड सेलिब्रिटींना लक्ष्य करत असतो. असे म्हणता येईल कि त्याने कोणालाही सोडलेले नाही. आपल्या एका नवीन ट्विटमध्ये त्याने हृतिक रोशनवर निशाणा साधला आहे. कंगना रनौतसोबतच्या अफेअरबद्दल त्याने काही धक्कादायक दावे केले आहेत. हृतिकने कंगनाचे खासगी फोटो दाखवल्याचा आरोप केआरकेने केला आहे.
केआरकेने हा धक्कादायक खुलासा एका व्हिडीओद्वारे केला आहे ज्यामध्ये त्याने हृतिक आणि सैफ अली खानच्या विक्रम वेध या टीझरचा रिव्ह्यू केला आहे. व्हिडीमध्ये केआरकेने म्हंटले आहे कि टीझरचे वर येतो, सैफ आणि हृतिक समोरासमोर आहेत आणि हृतिक म्हणतो एक स्टोरी ऐका सर, धीराने आणि लक्ष देऊन ऐका.
केआरके पुढे म्हणाला कि हृतिक बाबू खोटी स्टोरी सांगत आहेत, अरे यार कधी खरी स्टोरी देखील सांगत जा. स्वतःची आणि कंगनाची त्याने पुढे म्हंटले, अरे मी तर विसरलोच. मला तर घरामध्ये बसून सर्व स्टोरी सांगतली होती. लॅपटॉप उघडून एकापेक्षा एक फोटो दाखवले होते.
आता केआरकेचा हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रत्येकजण यावर हृतिक आणि कंगनाच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. २०१० मध्ये काइट्स चित्रपटाच्या शुटींगदरम्यान कंगना आणि हृतिकचे अफेयर झाले होते. असो पुढे जाऊन दोघांनी एकमेकांविरुद्ध केस फाईल करून नात्याला वाईटरित्या संपवले होते.
दोन्ही स्टार्सच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर हृतिक लवकरच विक्रम वेधा चित्रपटामध्ये दिसणार आहे. ज्याच्या रिलीजची तयारी पूर्ण झाली आहे. या चित्रपटामध्ये सैफ अली खान आणि राधिका आपटे देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. कंगना लवकरच इमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहे.