प्रभाससोबतच्या रिलेशनच्या अफेयरच्या चर्चांवर कृतिने सोडले मौन, म्हणाली; “माझ्या लग्नाची तारीख…”

By Viraltm Team

Published on:

साउथ सुपरस्टार प्रभास आणि कृति सेनन गेल्या काही दिवसांपासून अफेयरच्या बातम्यांमुळे खूपच चर्चेमध्ये आहेत. दोघांच्या लग्नाची बातमी सध्या खूपच पसरली आहे. चाहते हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत कि दोघांमध्ये नेमके काय चालू आहे. आता कृतिने स्वतः प्रभाससोबत आपल्या लग्नाच्या आणि अफेयरच्या चर्चांवर मौन सोडले आहे.

प्रभाससोबत रिलेशनशिप असल्याच्या वृत्तावर तिने अजून देखील वक्तव्य केले नव्हते. पण आता कृतिने प्रभास आणि आपल्या रिलेशनशिपचे सत्य एक पोस्ट शेयर करून सांगितले आहे. कृतिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेयर केली आहे. तिने लीळीले आहे कि हे प्रेम आहे ना पीआर, आमचा भेडिया (वरुण धवन) रिअॅलिटी शोमध्ये जरा जास्तच वाइल्ड झाला होता. त्याच्या मजेशीर बोलण्यानंतर अनेक अफवा पसरल्या.

कृतिने पुढे लिहिले कि काही पोर्टल माझ्या वेडिंग डेटची घोषणा करत आहेत. तर तुमचा गैरसमज दूर करते. या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. यामध्ये काहीच तथ्य नाही. वास्तविक नुकतेच कृति सेनन आणि वरुण धवन झलक दिखला जा शोमध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचले होते.

तेव्हा बोलता बोलता वरुण कृतिच्या लव लाईफबद्दल बोलताना दिसला. वरुणने म्हंटले कि कृतिचे नाव कोणाच्या तरी हृदयात आहे. यावर करण जोहरने विचारले कि कोणाच्या हृदयात आहे. तेव्हा वरुण धवन म्हणाला कि एक व्यक्ती आहे जो मुंबईमध्ये नाही तो यावेळी शुटींगमध्ये व्यस्त आहे. दीपिका पादुकोणसोबत. वरुण धवनचे हे उत्तर ऐकून कृति सेनन हसू लागली होती. तेव्हा करण जोहर देखील हैराण झाला होता.

वरुण धवनच्या या बोलण्यावर कृतिने लाजत अशाप्रकारे प्रतिक्रिया दिली, त्यानंतर लोकांना वाटले कि वरुण प्रभास आणि कृतिच्या रिलेशनशिपबद्दल बोलताना दिसला. अनेक लोकांना वाटले कि वरुण धवनने कृति आणि प्रभासच्या रिलेशनशिपला बोलता बोलता कफंर्म केले. तेव्हापासून दोन्ही स्टार्सच्या लव अफेयरच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आता याच बातम्यांवर कृतिने प्रतिक्रिया देत सत्य सांगितले आहे.

प्रभास आणि कृति आदिपुरुष चित्रपटामध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. दोघांचा चित्रपट २०२३ मध्ये चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. कृति आणि प्रभास शिवाय चित्रपटामध्ये सैफ अली खान देखील आहे. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे कि चित्रपटाला दर्शकांकडून कसा प्रतिसाद मिळतो.

Leave a Comment