इतक्या गंभीर आजाराने ग्रासले होते कृति खरबंदाला, सोशल मिडियावर पोस्ट करून चाहत्यांना सांगितली आपली हालत !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री कृति खरबंदाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच ती एका आजाराने ग्रासली होती आणि याची माहिती तिने स्वतः सोशल मिडियावरून दिली आहे. तुम्ही पाहु शकता कि तीने आपला एक सेल्फी शेयर केला आहे आणि चाहत्यांना आपल्या प्रकृतीबद्दल सांगितले आहे. कृतिने एक पोस्ट शेयर केली आहे आणि त्यानंतर चाहत्यांनी तिला कमेंट करून प्रकृतीचे काळजी घेण्यास सांगितले आहे.कृति खरबंदाने नुकतेच आपला ३० वा वाढदिवस साजरा केला आहे. तिने या दरम्यान एक मोठा खुलासा केला कि ती मलेरियाने पिडीत आहे. त्याचबरोबर तिने एक सेल्फी देखील शेयर केला ज्यामध्ये तिची हालत पाहून साफ अंदाज लावला जाऊ शकतो कि ती आजारी आहे. कृतिने लिहिले आहे कि, हेलो, हा माझा मलेरियाचा चेहरा आहे. हे फक्त थोड्या वेळासाठी आहे कारण मला लवकरच कामावर पुन्हा परत जायचे आहे. आपल्या चाहत्यांच्या नावाने एक क्युट पोस्ट शेयर करत कृतिने लिहिले कि, मी लवकरच ठीक होईन आणि अपडेट देत राहीन.कृति खरबंदाने फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले कि, हा माझा मलेरियाचा चेहरा आहे. हा आत्ताच आला आहे. असो हे माझ्यासोबत जास्त काळ राहणार नाही. मी लवकरच ठीक होईन, कारण मला कामावर परत जायचे आहे. ज्या लोकांना माझी चिंता वाटत आहे त्यांना सांगू इच्छित आहे कि मी आता बरी आहे आणि आशा आहे कि उद्यापर्यंत मी अधिक चांगली होईन. तिने पुढे लिहिले आहे कि कधी कधी मला चांगले वाटत नाही पण ठीक आहे. या वर्षाने मला धैर्य आणि प्रेम करण्याची शिकवण दिली आहे. मी तुम्हा लोकांना अपडेट देत राहीन. तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद.

तसे याशिवाय कृति खरंबदाने चाहत्यांना हे देखील सांगितले आहे कि तिला मिम्स पाठवावेत. वास्तविक तिने सांगितले कि ती आराम करून करून कंटाळली आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच आपल्या आगामी प्रोजेक्टची शुटींग सुरु करणार आहे. तैश चित्रपटामध्ये ती शेवटची पाहायला मिळाली होती. या चित्रपटामध्ये ती आपला बॉयफ्रेंड पुलकित सम्राटसोबत दिसली होती.

Leave a Comment