विवाहबंधनात अडकल्यानंतर अथिया-केएलचा रोमँटिक अंदाज, फोटोज सोशल मिडियावर व्हायरल…पहा फोटोज…

By Viraltm Team

Published on:

अथिया शेट्टी आणि केएल राहुल आता आयुष्यभरासाठी एकमेकांचे झाले आहेत. सुनील शेट्टीने मुलीच्या लग्नानंतर मिडियासोबत बातचीत केली आणि त्यांना मिठाई देखील वाटली. या खास प्रसंगी ते पारंपारिक पोशाखात खूपच हँडसम दिसत होते.

अथिया आणि केएल राहुलने सुनील शेट्टीच्या खंडाळा स्थित बंगल्यामध्ये सात फेरे घेतले. या प्रसंगी बंगला खूपच छान सजवण्यात आला होता. वीकेंडवर मेहंदी, हळदी आणि संगीत सेरेमनीसोबत कपलच्या लग्नाचा सोहळा सुरु होता आणि २३ जानेवारी रोजी कपल विवाह बंधनात अडकले.

अथियाने इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेयर करत लिहिले आहे कि मी मी तुझ्यासोबत प्रेम कसे करावे ते शिकले. आज आपण जवळच्या आणि प्रियजनांमध्ये लग्न केले ज्यामुळे मी मला खूपच आनंद मिळाला. आभार आणि प्रेमाने माझे हृदय भरले आहे. आम्हाला या जर्नीसाठी आशीर्वाद हवा आहे. अथिया आणि केएल राहुल वेडिंग आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होते.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर विवाहबंधनात अडकले आहेत. दरम्यान सुनील शेट्टीच्या मुलीच्या लग्नामध्ये इंडस्ट्रीमधील त्याचे निवडक मित्रच सामील झाले होते, ज्यामध्ये सलमान खान, जॅकी श्रॉफ, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांसारख्या स्टार्ससह इंडस्ट्रीतील तिच्या काही मित्रांनी हजेरी लावली होती.

अथिया आणि केएल राहुल संध्याकाळी चार वाजता सात फेरे घेतले. बंगल्यामध्ये बरात दुपारी २ वाजण्याच्या आसपास पोहोचली होती. क्रिकेट जगतामधील सेलेब्स देखील लग्नामध्ये पोहोचले होते. आकांक्षा रंजन कपूर देखील गेस्टच्या लिस्टमध्ये सामील होती जी अथियाची जवळची मैत्रीण आहे. आता अथियादेखील अनुष्का शर्मा, सागरिका घाटगे, शर्मिला टागोर आणि हेजल कीच यांसारख्या सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाली आहे ज्यांनी क्रिकेटर्ससोबत लग्न केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

Leave a Comment