प्रसिद्ध गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नत यांचे निधन झाल्यामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ३१ मे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास केके यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा हादरा बसला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पासून ते बॉलीवूड इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकार अक्षय कुमार, रश्मी देसाई, गायक राहू वैद्य आणि स्वरा भास्कर यांनी गायक केकेच्या निधनाबाबत शोक व्यक केला आहे. गायक केके यांच्या निधनाचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार त्यांचे निधन हे कार्डियक अरेस्टमुळे झाल्याचे सांगितले जात आहे. केके ज्यावेळी कोलकाता येथे कॉन्सर्टमध्ये लाईव्ह परफॉर्म करत होता त्यावेळी त्यांना हा स्ट्रोक आल्याचे समजते आहे. त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
परंतु हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गायक केके यांचा मृत्यू कशाने झाला याचे कारण अद्याप डॉक्टरांनी स्पष्ट केलेले नाही. केके यांचे पोस्टमॉर्टम केल्यानंतरच मृत्यूचे मूळ कारण समजू शकेल.
केके यांना ३१ मे रोजी रात्री १०.३० वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याअगोदर ते नजरूल मुंचा नावाच्या एका ऑडिटोरियममध्ये लाईव परफॉर्म करत होते. परफॉर्म करताना अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि ते बेशुद्ध होऊन खाली पडले.
याआधी त्यांचा ३० मे रोजी अजून एक कॉन्सर्ट शो झाला होता. ५३ वर्षीय गायक केके यांनी १९९६ साली आपल्या करियरची सुरुवात केली होती त्यांनी माचीस चित्रपटामधील छोड आए हम वो गलियाँ या गाण्याला आपला आवाज दिला होता.
#EXCLUSIVE
The very moment when playback singer KK was being taken back to hotel after he complained about his health condition. He has been declared brought dead by the doctors of CMRI. #KK #NewsToday #KKsinger #KKDies #kkdeath #SingerKK@ANI @MirrorNow @TimesNow @htTweets pic.twitter.com/zX5A2ZPvTW— Tirthankar Das (@tirthaMirrorNow) May 31, 2022
त्यानंतर त्यांनी तड़प तड़पके’, ‘बर्दाश्त नहीं कर सकता’, ‘दस बहाने’, ‘आंखों में तेरी’, ‘तू ही मेरी शब है’, ‘खुदा जाने’ आणि ‘जिंदगी दो पल की अशी बरीच सुपरहिट गाणी बॉलीवूडला दिली. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांना केके हे आपले प्रेरणास्थान मानत होते. विशेष म्हणजे केके यांनी संगीताचे कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. आपल्या कलेच्या जोरावर त्यांनी बॉलीवूडमध्ये आपली एक विशेष ओळख निर्माण केली होती