‘केके’च्या मृ’त्यू’चा रिपोर्ट आला समोर, कोलकाता पोलिसांनी केली ध’क्का’दायक माहिती उघड; म्हणाले, “स्नायू पिवळे पडले होते आणि”…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक केकेच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ३१ मे रोजी कोलकाताच्या एका कार्यक्रमादरम्यान केकेचे निधन झाले. केकचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता असे प्राथमिक अहवालामध्ये सांगितले गेले होते.

आता मात्र कोलकाता पोलिसांनी एक नवीन धक्कादायक माहिती समोर आणली आहे. पोस्टमॉर्टममध्ये आलेल्या रिपोर्टनुसार पोलीस म्हणाले कि केकेच्या हृदयाच्या वरच्या भागाच्या आसपासचे सगळे स्नायू हृदयाच्या इतर भागांपेक्षा खूपच जास्त पिवळे पडले होते.

या माहितीमुळे आता एक खळबळ उडाली आहे. मॅक्रोस्कोपिकच्या तपासणीच्या आधारावर असे सांगण्यात आले आहे कि, गायक केकेचा मृत्यू हा तीव्र कार्डिओजेनिक पल्मोनरी एडेमानंतर हायपोक्सियामुळे झाला आहे. हि समस्या रक्तस्राव संबंधी समस्यांमध्ये येते.

सबआर्कनॉइड हेमरेज हा असा स्ट्रोक आहे ज्यामुळे मेंदूमध्ये आणि आसपासच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणत रक्तस्त्राव होऊ लागतो. मेडिकल रिपोर्टनुसार केकेच्या सब-पेरीकार्डियल फॅटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

तर इंटरव्हेंट्रिक्युलर धमनीच्या जवळपास पिवळे आणि पांढरे डाग दिसून आले आहेत. त्यामुळे शरीरामधील भाग आकुंचन पावले होते. त्याच्या डाव्या बाजूला कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज देखील सापडले आहेत आणि लहान रक्तवाहिन्यांमध्ये लहान ब्लॉकेज देखील झाले होते.

आता एफएसएल आणि पॅथॉलॉजी विभागाकडून अंतिम रिपोर्ट आल्यानंतरच पुढचा निष्कर्ष काढण्यात येणार आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक केकेने ३१ मे रोजी या जगाचा निरोप घेतला. शोदरम्यान त्याची तब्येत अचानक खालावली आणि तो खाली कोसळला. यानंतर जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आले होते पण वाटेमध्येच त्याचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment