कियारा अडवाणीने लग्नामध्ये घातला होता हँडकट डायमंड नेकलेस, मनीष मल्होत्राचे खास आहे हे कलेक्शन, फोटो झाले व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

जसे कि तुम्हाला माहिती आहे कि सध्या कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा त्यांच्या लग्नामुळे खूपच चर्चेमध्ये आले आहेत. दोघांनी ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेरच्या सूर्यगडमध्ये सात फेरे घेतले. लग्न झाल्यानंतर दोघांचे फोटो समोर आले आहेत जे सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

अशामध्ये नववधूच्या रुपामधील कियारा अडवाणीचा लुक सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. तिच्या लेहेंग्यासोबत तिच्या ज्वेलरीची देखील खूपच चर्चा आहे. अशामध्ये नेकलेसपासून ते भांगेमधील टिक्यापर्यंत प्रत्येक गोष्ट खूपच खास पाहायला मिळत आहे. यामागे सर्वात मोठा हात फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा असल्याचे म्हंटले जात आहे.

मनीष मल्होत्राने फक्त या कपलचा वेडिंग आउटफिटच तयार केलेला नाही तर ज्वेलरी देखील त्याच्याच कलेक्शनमधून घेण्यात आली आहे. खास बाब तर हि आहे कि डिझायनर मनीष मल्होत्राने आपल्या ब्राइडल ज्वेलरी कलेक्शनच्या लॉन्चिंग अगोदरच अभिनेत्री कियारा अडवाणीच्या लग्नामध्ये त्याची झलक पेश केली आहे.

जैसलमेरमध्ये झालेल्या या लग्नासाठी सर्वात पहिला कियारा अडवाणीसोबत मनीष मल्होत्रा पोहोचले होते आणि सर्वाना असे देखील वाटले होते कि मनीष मल्होत्रा ब्राइडल आउटफिट साठी तिच्यासोबत आला आहे पण त्याने फक्त ब्राइडल आउटफिट नाही तर ज्वेलरी देखील डिझाईन केली आहे. आता त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

Leave a Comment