सिड-कियाराने अशी बनवली संगीतची रात्र यादगार, हातामध्ये हात घालून बेधुंध नाचले कपल…

By Viraltm Team

Published on:

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा, बी-टाउनच्या सर्वात लोकप्रिय आणि आवडत्या सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहे. नुकतेच राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये ७ फेब्रुवारी २०२३ रोजी शाही अंदाजामध्ये दोघे विवाहबद्ध झाले. लग्नानंतर, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्यांच्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहेत आणि यासोबतच, हे जोडपे त्यांच्या लग्नाचे आणि लग्नापूर्वीच्या समारंभांचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत आहेत.

विवाहबंधनात अडकल्यानंतर कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे पहिले फोटो सोशल मीडियाद्वारे दाखवले आणि आता हे जोडपे त्यांच्या लग्नाआधीच्या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. हळदी आणि मेहेंदीचे फोटो शेअर केल्यानंतर, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आता त्यांच्या संगीत सेरेमनीमधील काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. जे सध्या खूपच व्हायरल होत आहेत. नवविवाहित जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा शाही अंदाज समोर आलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे त्यांच्या लग्नापासून त्यांच्या चाहत्यांचे आवडते कपल बनले आहे. आता कपलच्या लग्नाला २ आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु अजूनही या कपलच्या लग्नाचे आणि लग्नापूर्वीच्या समारंभांचे फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान, २१ फेब्रुवारी, २०२३ रोजी, कियारा सिड-कियाराने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्या लग्नाआधीच्या संगीत सेरेमनीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचा सुंदर अंदाज संगीत सेरेमनीमध्ये पाहायला मिळत आहे. यादरम्यान दोघांनी मनीष मल्होत्राचने डिझाइन केलेले आऊटफिट परिधान केले होते ज्यामध्ये दोघेही शाही कपलसारखे दिसत होते. संगीत सेरेमनीमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीने सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, ज्यामध्ये कियारा अडवाणी परीसारखी सुंदर दिसत होती. सिद्धार्थ मल्होत्रा काळ्या आणि सोनेरी रंगाची शेरवानी परिधान करून खूपच स्टायलिश दिसत होता.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर त्यांच्या संगीत सेरेमनीचे चार फोटो शेयर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांसोबत अतिशय रोमँटिक अंदाजामध्ये पोज देताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळत आहे आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडलेले दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

तिसर्याे फोटोमध्ये हे कपल मस्तीच्या अंदाजामध्ये दिसत आहे संगीत सेरेमनीच्या या चार फोटोंमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा खरोखरच क्युट दिसत आहेत आणि दोघांच्या संगीत सेरेमनीचे हे फोटो पाहता, त्यांनी त्यांच्या संगीत सेरेमनीच्या रात्री खूप धमाल केली असे दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

Leave a Comment