सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या वेडिंग रिसेप्शनची ग्रँड पार्टी आयोजित करण्यात आली होती. जिथे बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सेलेब्ससोबत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीची पत्नी श्लोकसोबत कियारा अडवाणी पार्टीमध्ये पोहोचले होते.
कियारा-सिद्धार्थच्या रिसेप्शन पार्टीमध्ये दिग्गज स्टार्स सामील झाले होते. आलिया भट्ट तिचा रूमर्ड एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अंगावर तारे लपेटून पोहोचली होती. आलियाने सिद्धार्थ-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनसाठी स्टोन आणि सिक्विनची साडी नेसली होती. लुक कंप्लीट करण्यासाठी आलियाने कोणतही ज्वेलरी न घालता लाईट मेकअप केला होता.
करीना कपूर तिचा बेस्ट फ्रेंड करण जोहरसोबत सिद्धार्थ कियाराच्या सेलिब्रेशनमध्ये पोहोचली होती. करीना पिंक कलरच्या सीक्वेन साडीमध्ये कमालीची सुंदर दिसत होती. त्याचबरोबर करण जोहरने काळ्या कलरचा टक्सीडोसोबत व्हाईट शर्ट कॅरी केला होता.
सिद्धार्थ कियाराच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या दिशा पटनीचा लुक खूपच सेक्सी होता. अभिनेत्रीने ग्रीन सीक्वेन हाईस्लिट स्कर्ट आणि छोटा-सा टॉप घालून स्टाइलमध्ये पोज दिल्या. दिशाने आपल्या केसांना मोकळे सोडून लुक कंप्लीट केला होता.
सिद्धार्थ कियाराच्या पार्टीमध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया डीसूजा पॉवर कपल प्रमाणे जबरदस्त एंट्री केली. तर भूमी पेडणेकरने छोट्या गोल्डन ब्लाऊजमध्ये सर्वांचे लक्ष आपल्या कडे वेधून घेतले. आलिया भट्ट आणि तिची सासू नीतू कपूरचा बोल्ड अंदाज पाहून प्रत्येकजण इंप्रेस झाला. शनाया कपूरने ब्रालेस डीपनेक ड्रेस घालून स्टाईलाचा तडका लावला. अभिषेक बच्चन आणि शिल्पा शेट्टी नेहमी प्रमाणे डॅशिंग अंदाजात पाहायला मिळाले.