“कबीर सिंह चित्रपटाच्या शुटींगदरम्यान मी शाहिदच्या…” कियारा अडवाणीचे धक्कादायक वक्तव्य…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवुड अभिनेत्री कियारा आडवाणी नुकतेच प्रसिद्ध फिल्ममेकर करण जौहरच्या चॅट शो कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहे. कबीर सिंह अभिनेत्री या शोदरम्यान तिचा को-स्टार अभिनेता शाहिद कपूरसोबत पाहायला मिळणार आहे. शोदरम्यान कियाराने एक सणसणीत खुलासा केला आहे कि, तिला तिचा को-स्टार अभिनेता शाहिद कपूरला थप्पड मारण्याचे मन करत होते. शोदरम्यान एका गेममध्ये कियाराला प्रश्न विचारला गेला कि शाहिद कपूरला थप्पड मारण्याची इच्छा होती ? ज्यावर उत्तर देताना कियाराने खुलासा केला.

करण जौहरच्या प्रश्नांना उत्तरे देताना कियारा म्हणाली कि कबीर सिंह चित्रपटाच्या शुटींगदरम्यान माझा तिसरा किंवा चौथा दिवस होता आणि मला आठ तास वाट बघायला लावली कारण या गोष्टीची चर्चा सुरु होती कि शाहीद पुढच्या सीनमध्ये कोणते बूट घालणार आहे.

कियाराने वक्तव्याचे समर्थन करत करणने शाहिदला थप्पड मारण्याच्या कियाराच्या निर्णयावर म्हंटले, जर मला देखील बुटाच्या चर्चेवर आठ तास वाट बघायला लावली असती तर मी देखील थप्पड मारली असती. कॉफी विथ करणच्या नवीन एपिसोडमध्ये कियारा आणि शाहिद प्रेम, कुटुंब, लग्न आणि बॉलीवूडबद्दल अनेक रंजक गोष्टी करताना दिसणार आहे.

हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर दर गुरुवारी रात्री १२ वाजता नवीन एपिसोडसोबत स्ट्रीम केला जाऊ शकतो. कबीर सिंह चित्रपट साउथचा सुपरहिट चित्रपट अर्जुन रेड्डी चित्रपटाचा रिमेक होता. चित्रपटामध्ये शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसले होते. चित्रपटाला दर्शकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला होता. खास करून चित्रपटामधील गाण्यांना चाहते आज देखील पसंद करतात.

Leave a Comment