कॅटरीना कैफने आज बॉलीवूडमधील एक फेमस अभिनेत्री आहे. आपल्या टॅलेंट आणि ग्लॅमरस अंदाजामुळे कॅटरीनाने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, जी मिळवण्यासाठी अनेक स्टार्स तरसतात. पण हि प्रसिद्धी कॅटरीना कैफला खूपच अडचणींनंतर मिळाली आहे. आपल्या करियरच्या सुरुवातीला तिला देखील अडचणींचा सामना करावा लागला होता. आता एका नवीन मुलाखतीमध्ये तिने सांगितले कि कसे तिला एका चित्रपटामधून शॉट दिल्यानंतर काढून टाकण्यात आले होते.

आपल्या एका नवीन मुलाखतीमध्ये कॅटरीना कैफने सांगितले कि साया चित्रपटामधून तिला एक शॉट दिल्यानंतर रिप्लेस केले गेले होते. ती रडत होती आणि तिला सांगितले गेले कि ती अभिनेत्री बनू शकत नाही. तिच्यामध्ये काहीच नाही. ती पुढे म्हणाली कि साया नावाच्या एका चित्रपटामधून मला काढून टाकले होते. हा चित्रपट अनुराग बसुने बनवला होता आणि यामध्ये जॉन अब्राहम आणि तारा शर्माने काम केले होते. एक शॉट दिल्यानंतर एक दिवस देखील नाही तर एक शॉट, केल्यानंतर मला काढून टाकले गेले. त्यावेळी मला वाटले होते कि माझे करियर आता संपले.

ती पुढे म्हणाली कि मला वाटते कि एक कलाकार म्हणून कोणालाही रिजेक्शन झेलावे लागते. कडची सर्वाना नाही. पण अनेक कलाकर असे आहेत ज्यांना याचा सामना करावा लागला आहे. माझ्यासोबत देखील असेच झाले. मला तोंडावरच म्हंटले गेले कि तू अभिनेत्री बनू शकत नाहीस. तुझ्यामध्ये काहीच नाही. मी तेव्हा खूप रडले होते.

कॅटरीना कैफने २००३ मध्ये बूम चित्रपटामधून आपल्या बॉलीवूड करियरची सुरुवात केली होती. हा चित्रपट फ्लॉप झाला होता. यानंतर तिने राजनीती, टायगर जिंदा है, जीरो, जब है जान, अजब प्रेम की गजब कहानी आणि नमस्ते लंडन सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

साया बद्दल बोलायचे झाले तर हा एक फँटसी रोमांस चित्रपट होता. या चित्रपट ड्रॅगनफ्लाय या हॉलिवूड चित्रपटाची कॉपी होता. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसुने केले होते आणि याचे प्रोड्युसर महेश भट्ट होते.