कॅटरीना कैफ आणि विक्की कौशल बॉलीवूडच्या मोस्ट पॉपुलर कपलपैकी आहेत. नुकतेच कॅटरीना आणि विक्कीने लग्नानंतर आपली पहिली दिवाळी सेलिब्रेट केली ज्याचे काही फोटो दोघंही शेयर केले होते. विक्कीचे नेहमी कौतुक करणारी कॅटरीना कैफने एका मुलाखतीमध्ये विक्कीच्या एका वाईट सवयीबद्दल सांगितले, जी तिला नेहमी त्रासदायक वाटते.
नुकतेच कॅटरीना कैफने एका मुलाखतीमध्ये विक्कीच्या चांगल्या आणि वाईट सवयींचा खुलासा केला. त्याचबरोबर तिने आलिया भट्टपासून सलमान खानपर्यंत अनेक कलाकारांबद्दल बातचीत देखील केली. कॅटरीनाने विक्कीची सर्वात गोड गोष्ट शेयर करत म्हणाली कि विक्की जेव्हा डांस करतो तेव्हा तो खूपच खुश असतो. डांससोबत विक्कीला गाणे म्हणायला देखील आवडते आणि तो एक चांगला सिंगर देखील आहे. जेव्हा मला अनेकवेळा रात्री झोप येत नाही तेव्हा विक्की स्वतः गाणे म्हणून मला झोपवण्याचा प्रयत्न करतो.
विक्की कौशलच्या त्रासदायक गोष्टीबद्दल सांगताना कॅटरीना म्हणाली कि विक्की अनेकवेळा खूपच जिद्दी होती आणि त्याची हि सवय मला खूपच त्रासदायक वाटते. रॅपिड फायर राउंड दरम्यान कॅटरीनाला तिच्या सह-कलाकाराशी असलेल्या रिलेशनबदल विचारण्यात आले. सलमान खानचे नाव घेतल्यानंतर अभिनेत्री म्हणाली कि तो खूपच मजेदार व्यक्ती आहे.
आलियाबद्दल बोलताना ती म्हणाली कि आलिया नेहमीच तिच्यासाठी खास राहिली. तर प्रियांकाला कॅटरीनाने इंस्पिरेशनल म्हंटले तर शाहरुख खानला ज्ञानी म्हंटले कारण तो नेहमी काहीना काही नवीन गोष्टी करत असतो.