लग्नानंतर विक्की कौशल असे घालवत आहे रात्र आणि दिवस, यावरून कॅटरिना आणि विक्की दरम्यान होतात नेहमी वाद…

By Viraltm Team

Published on:

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो कॉफी विथ करण मध्ये अनेक कलाकारांनी आपल्या लाईफसंबंधी मोठे खुलासे केले आहेत. यावेळी विक्की कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी शोच्या काऊच शोभा वाढवली. आता शोमध्ये विक्की आला होता तर त्याच्या विवाहित आयुष्यासंबंधी विषय निघणारच होता.

करणने विक्कीच्या पर्सनल लाईफसंबंधी प्रश्न विचारले तेव्हा त्याच्या लग्नाविषयी अनेक खुलासे झाले. शोच्या नवीन एपिसोडमध्ये विक्की कौशलने आपल्या पर्सनल लाईफसंबंधी उघडपणे चर्चा केली. इतकेच नाही तर हे देखील सांगितले कि त्याचे आणि कॅटरिनाचे कोणत्या कारणावरून भांडण होते.

कॉफी विथ करणच्या ताज्या एपिसोडमध्ये करण जौहरने विक्की कौशलला प्रश्न विचारला कि अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तुझ्यात आणि कॅटरिनादरम्यान भांडण होते. यावर विक्की लगेच म्हणाला कि क्लो जेट स्पेस. यावर विस्ताराने बोलताना विक्की म्हणाला कि हे कमी होत चालले आहे. वन अँड हाफ रूमवर तिनेच कब्जा करून ठेवला आहे.

एक एक कपबोर्ड मिळाला आहे मला आणि लवकरच तो एक ड्रॉअर बनेल. विक्कीचे बोलणे ऐकल्यानंतर करणने देखील यावर सहमती दर्शवली. करण म्हणाला कि विक्की आणि कॅटरिनाच्या घरी गेलो आहे. त्यांच्याजवळ खरोखरच एक क्लो जेट स्पेस आहे.

शोमध्ये करण जौहरने विक्कीला पत्नी कॅटरिनाच्या बेकार चित्रपटाबद्दल विचारले. याचे उत्तर देताना विक्कीने फितूर चित्रपटाचे नाव घेतले. तर फेमस रॅपिड फायर राउंडमध्ये विक्कीने खुलासा केला कि कॅटरिना चांगली कुक आहे. असो गेल्या डिसेंबरमध्ये विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ यांनी धुमधडाक्यात लग्न केले होते.

दोघांच्या लग्नाचे फोटो आज देखील सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. तर दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर लवकरच कॅटरिना कॅटरिनासोबत टायगर ३ मध्ये दिसणार आहे. कॅटरिनाचा पुढचा चित्रपट फोन भूत ४ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत इमरान हाशमी देखील मुख्य भूमिकेमध्ये आहे. याशिवाय विक्की कौशल सॅम बहादुर, गोविंदा नाम मेरा आणि द इमोर्टल अस्वथामा सारख्या मोठ्या चित्रपटांवर काम करत आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment