‘भूल भुलैया २’ चित्रपटाने केली रेकोर्ड ब्रेक कमाई, म्हणून प्रोड्युसर भूषण कुमारने कार्तिक आर्यनला भेट म्हणून दिली ‘इतक्या’ कोटींची महागडी कार…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनला मॅकलॅरेन जीटी कार गिफ्ट म्हणून मिळाली आहे. बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री मधील कलाकारांना भेट म्हणून कार मिळणे हि खूपच सामान्य गोष्ट आहे पण मॅकलॅरेन कार भेट म्हणून मिळणे हि खूप मोठी गोष्ट आहे.

इतकेच नाही तर मॅकलॅरेन कार असलेल्या कार्तिक आर्यन हा भारतामधील पहिलाच व्यक्ती ठरला आहे. यापूर्वी हि कार भारतामध्ये कोणाकडेच नव्हती. भूल भुलैया २ चित्रपटाने मिळवलेल्या घवघवीत यशामुळे कार्तिकला हि कार टी सिरीजचे चेअरपर्सन आणि प्रोड्युसर भूषण कुमार यांनी भेट दिली आहे.

दोघांनी या कारच्या समोर पोज देतानाचे काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. मॅकलॅरेन जीटी हि काही साधी कार नाही तर ती सुपरकार आहे. या कारमध्ये असणारे फीचर्स आणि टेक्नॉलॉजी या कारला आणखीनच खास बनवते.

भारतामध्ये या कारची किंमत तब्बल ८.७ करोड रुपये इतकी आहे. हि एक टू सीटर कार असून एअरडायनॅमस्कसोबत येते. या कारमध्ये ८.० लिटरचे ट्वीन-टर्बोचार्जड वी८ इंजिन देण्यात आले आहे. हि कार ६१२ एचीपीची पॉवर आणि ४३० एनएमचा टॉर्क जनरेट करते.

या इंजिनच्या मदतीने अवघ्या ३.२ सेकंदात ६२ मैल प्रती तासाचा वेळ पकडता येतो. एलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल सिस्टम देखील देण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्तम ब्रेकिंग सिस्टिम देखील यामध्ये अवलेबल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कारमध्ये ७ इंचाचा न्फोटेन्मेंट सिस्टम अॅड अॉन करण्यात आला आहे. हा उत्तरं ग्राफिक्स आणि एम्बिअंट लाईटसोबत येतो. कारमध्ये ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, सॅटलाईन नेव्हिगेशन, एसी आणि मीडिया स्ट्रीमिंगतं कंट्रोल देण्यात आलं आहे. याशिवाय कारमध्ये इलेक्ट्रोक्रोमिक पॅनारोमिक सनरुफ देण्यात आलं आहे आणि ५ लेव्हल पर्यंत एक बटनानं कंट्रोल केलं जाऊ शकतं.

Leave a Comment