करिश्मा कपूर आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. २५ जून १९७४ रोजी तिचा मुंबईमध्ये कपूर कुटुंबामध्ये जन्म झाला होता. ती प्रसिद्ध अभिनेता रणधीर कपूर आणि बबीताची मुलगी आहे. करिष्माने तसे तर आपल्या करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण ती जास्तकरून पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेमध्ये राहिली.
पहिला अभिषेक बच्चनसोबत तिचे नाते तुटले आणि तिने दिल्लीस्थित घटस्फोटीत व्यावसायिक संजय कपूरसोबत लग्न केले. तथापि या लग्नानंतर तिचे आयुष्य नर्क बनले होते. पतीने तिला खूपच त्रास दिला होता आणि सासू आणि दिराने देखील तिचे जिने मुश्कील केले होते. अनेक दिवस अ त्या चार सहन केल्यानंतर तिने शेवटी पतीपासून घटस्फोट घेतला.
करिश्मा कपूरचे अभिषेक बच्चनसोबतचे नाते तुटल्यानंतर अचानक अशी बातमी आली कि तिने दिल्ली येथील एका व्यावसायिकाशी लग्न केले आहे. कपूर कुटुंबाने आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नामध्ये कोणतीच कसर बाकी ठेवली नव्हती. करिश्मा कपूरने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि जेव्हा ती संजय कपूरसोबत ह नि’मूनला गेली होती तेव्हा तिच्या पतीने तिचा सौदा त्याच्या दोस्तांसोबत केला होता. त्यांच्यासोबत झोपण्यास तिला मजबूर केले होते होते.
करिश्मा कपूरने हे देखील सांगितले होते कि तिचा पती त्याच्या लहान भावाला तिच्यावर नजर ठेवायला सांगायचा. याचे कारण हे होते कि तिच्या पती शंका घ्यायचा. कधी कधी संजय तिला मारहाण देखील करायचा. इतकेच नाही तर करिश्मा कपूरने हे देखील सांगितले कि तिची सासू देखील तिला खूप त्रास द्यायची. जेव्हा ती प्रेग्नंट होती तेव्हा देखील तिला खूप त्रास दिला गेला. सासू तिला टाइट कपड़े घालण्यास मजबूर करायची.
करिश्मा कपूरने २००३ मध्ये लग्न केले होते आणि जवळ जवळ ५-६ वर्षांनंतर ती पतीपासून घटस्फोट घेऊन वेगळी झाली. सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून तिने २०१२ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तिचा घटस्फोट २०१६ मध्ये फाईल झाला होता.
View this post on Instagram
करिश्मा कपूरने प्रेम कैदी चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. तिचा पहिला हिरो हरीश कुमार होता. यानंतर तिने राजा बाबू, कुली नं. वन, हीरो नं. वन, जीत, अंदाज अपना अपना, राजा हिन्दुस्तानी, हम साथ साथ है, रिश्ता, दिल तो पागल है, अनाड़ी, जुड़वा, बीवी नं. वन, दुल्हन हम ले जाएंगे, गोपी किशन, हसीना मान जाएगी सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.