बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर बॉलीवूडच्या अनेक पसंदीच्या जोडींपैकी एक आहे. तथापि करीना सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे पण दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळते. करीना नेहमी सोशल मिडियावर आपल्या कुटुंबासोबत घालवलेल्या आठवणी शेयर करत असते.
जेव्हा देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये आइडल कपलबद्दल बोलले जाते तेव्हा सर्वात पहिले नाव या दोघांचे येते. पण काही दिवसांपूर्वी करीनाने अशी गोष्ट बोलली आहे ज्यामुळे सैफ नाराज झाला आहे आणि करीनाला देखील खूप जास्त ट्रोल केले जात आहे.
बॉलीवूडची दुनिया सामान्य दुनियेपेक्षा खूपच जास्त वेगळी आहे. बॉलीवूडशी जोडले गेलेले लोक नेहमी कोणत्याना कोणत्या वादामध्ये अडकलेले असतात. कधी कधी हे सर्वांसमोर अशा गोष्टी बोलतात ज्यामुळे नंतर यांना पश्चाताप करावा लागतो. यावेळी देखील असेच घडले आहे. तसे तर करीना आणि सैफची जोडी फेवरेट जोडींपैकी एक आहे पण यावेळी करीनाने अशी गोष्ट बोलली आहे ज्यामुळे करीना खूपच चर्चेमध्ये आली आहे, आणि तिला खूप ट्रोल देखील केले जात आहे.
करीनाने सर्वांसमोर असे म्हंटले आहे कि, ती सैफला सोडू इच्छिते. हि गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा करीना आणि अर्जुन की एंड का चित्रपटाचे प्रमोशन करत होते. करीना आणि अर्जुनने की एंड का चित्रपटामध्ये सोबत काम केले होते. चित्रपटामध्ये दोघांनी पती-पत्नीची भूमिका केली होती.
चित्रपटामध्ये दाखवले गेले होते कि जिथे करीना एक वर्किंग वूमेन आहे आणि अर्जुन हाउस-हसबंड आहे. जेव्हा प्रमोशन दरम्यान करीनाला प्रश्न विचारला गेला कि, ऑफस्क्रीन पति सैफ आणि ऑनस्क्रीन पति अर्जुन कपूरमध्ये कोण जास्त चांगले आहे. तर करीनाने हसत उत्तर दिले.
करीनाने म्हंटले कि अर्जुन कपूर इतकी मेहनत करतो कि त्याला पाहूनच असे वाटते कि सैफला सोडून अर्जुन कपूरसोबत लग्न करावे. यापुढे ती म्हणाली कि सैफ अली खान आणि अर्जुन कपूरची तुलना करणे ठीक नाही. कारण या दोघांची तुलना केली जाऊ शकत नाही.