बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान पुन्हा एकदा पॅरेंट्स बनणार आहेत. तैमुर देखील आपला भाऊ किंवा बहिण येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतेच सोशल मिडियावर तैमुर एका लहान मुलासोबत खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तैमुरने एका बेबी गर्लला घेतलेले पाहायला मिळाले होते. तर तैमुर स्माईल करताना दिसला होता.
त्यांनी गेल्या दिवसांमध्ये आपल्या चाहत्यांना हि आनंदाची बातमी सांगितली होती. आता करीनाच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. या मुलाखतीमध्ये तिने म्हंटले होते कि, मला पहिली मुलगी हवी होती. २०१६ मध्ये करीना प्रेग्नंट होती. त्यावेळी तिने म्हंटले होते कि तिला मुलगी जन्माला यावी.
बातमीनुसार करीनाने सांगितले होते कि ती जिथे देखील जाते तिथे तिला विचारले जाते कि मुलगी होणार आहे का मुलगा. यावर बेबोने उत्तर देताना सांगितले होते कि यामुळे काय फरक पडणार आहे? ती एक मुलगी आहे आणि तिची इच्छा आहे कि एक मुलगीच जन्माला यावी.
करीनाने हे देखील म्हंटले होते कि तिने आपल्या पॅरेंट्ससाठी एका मुलापेक्षा जात सर्वकाही केले आहे. तिने गर्ल चाईल्डच्या सपोर्टमध्ये स्ट्रॉन्ग मॅसेज दिला होता. तिने म्हंटले होते कि जे लोक मुलींना बरोबरीचा दर्जा देत नाहीत त्यांना माहिती असावे कि महिला ती जीव असते जिला आणखी एकाला जीवन देण्याचा अधिकार असतो.
करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा लाल सिंघ चड्डा हा चित्रपटा २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये ती आमीर खानसोबत मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. चाहते देखील तिच्या आगामी चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत. आता तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कसे प्रदर्शन करेल हे येणारा काळच ठरवेल.