या एका अटीवर दोन मुलांची आई असलेल्या करीनाला हवे आहे तिसरे मुल, म्हणाली, मी सैफच्या मुलाला माझ्या…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानने आपल्या पहिल्या प्रेग्नंसी दरम्यान देखील आपले काम सुरु ठेवले होते. तर तिचा पहिला मुलगा तैमुर आली खान जन्मानंतर तो रातो-रात भारतातील प्रसिद्ध स्टार किड बनला होता. गेल्या वर्षीच करीनाने सैफ अली खानचा दुसरा मुलगा जहांगीरला जन्म दिला होता. तथापि खूपच कमी लोकांना हि गोष्ट माहिती आहे कि एक काळ असा देखील होता जेव्हा करीना नॅचरल पद्धतीने आई न बनता सरोगेसीचा विचार करत होती.

माहितीनुसार करीना कपूर खानच्या प्रेग्नेंसी बाइबल: द अल्टीमेट मैनुअल फॉर मॉम्स-टू-बी या पुस्तकामध्ये याचा उल्लेख केला गेला आहे. तिचा पती सैफ अली खानने यावर खुलासा केला होता कि तिने आपल्या पहिल्या मुलाच्या प्लानिंग दरम्यान सरोगेसीद्वारे आई बनण्याच्या पर्यायावर चर्चा केली होती.

सैफ अली खानने आपली पत्नी करीना कपूर खानच्या प्रेग्नेंसी बाइबिल: द अल्टीमेट मैनुअल फॉर मॉम्स-टू-बी मध्ये लिहिले होते कि करीनाने आई बनण्यासाठी सरोगेसीचा विचार केला होता. छोट्या नवाबने देखील खुलासा केला कि त्याने जेव्हा करीनाला डेट करायला सुरुवात केली होती तेव्हा तिची साईज झिरो होती.

सैफ अली खानने लिहिले कि, इंडस्ट्रीमध्ये एका अभिनेत्रीवर खूप दबाव असतो. तुम्ही कसे दिसत यावर खूप काही अवलंबून असते. जेव्हा आमचे नाते सुरु केले होते तेव्हा ती झिरो साईजमध्ये होती. किड्स स्टोरमधून खरेदी करायची कारण फक्त तिथेच तिच्या फिटिंगचे कपडे मिळत होते. तिचे करियरदेखील खूप चांगले सुरु होते. सैफने हा देखील खुलासा केला कि करीनाने सरोगेसीपासून वाचण्यासाठी आणि नॅचरल पद्धतीने आई बनण्यास स्वतःला तयार करण्यासाठी खूप वेळ घेतला होता.

पुस्तकामध्ये लिहिले आहे कि, प्रेग्नंसी बॉडीवर खूप परिणाम करते. तुम्हाला परत शेपमध्ये येण्यासाठी खूप वेळ लागतो. करीना यामुळे खूपच चिंतेत होती. जेव्हा आम्ही पहिल्यांदा मुलाबद्दल विचार केला तेव्हा तिने सरोगेटसाठी विचार केला होता. पण तिला नंतर जाणीव झाली कि लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीला १००% देण्याची गरज असते.

दुसऱ्या मुलाची प्लानिंग करताना करीनाने सेरोगेसीबद्दल सैफ अली खानसोबत बातचीत केली होती. एका मुलाखती दरम्यान करीना कपूरने सैफच्या प्रतिक्रियेबद्दल बातचीत केली होती. करीना म्हणाली होती कि, माझ्या मनामध्ये होते कि सेरोगेसी केली पाहिजे. सैफने रिअॅक्ट करताना म्हंटले कि जर आपल्याला मुले होत असतील तर स्वतः प्रयत्न का करू नये ?

Leave a Comment