बॉलीवूडची मीन गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर खान नेहमी चर्चेमध्ये बनून राहते. करीना कपूर बेधडक आणि बिनधास्त अभिनेत्री आहे जी नेहमी आपले आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगते. कंट्रोवर्सियल स्टेटमेंट देण्यास अभिनेत्री करीना कपूर कधीच मागेपुढे पाहत नाही.
आपल्या या बेधडक अंदाजामुळे ती लाखो चाहत्यांचा मनावर राज्य करते. करीना एक अशी अभिनेत्री आहे जिने इंडस्ट्रीमध्ये ट्रेंड देखील सेट केला आहे आणि अनेक अनेक जुने ट्रेंड मोडले आहेत. तिच्या स्टाईल आणि सौंदर्यावर लाखो चाहते फिदा आहेत.
करीना कपूरने आपला जोडीदार म्हणून सैफ अली खानला निवडले आहे. आज ती सैफची पत्नी देखील आहे आणि दोन मुलांची आई देखील आहे. २०१२ मध्ये करीनाने सैफ सोबत लग्न केले होते. यानंतर दोघांनी काही वर्षांनंतर तैमुरला जन्म दिला. तर गेल्या वर्ष तिने मुलगा जेहला जन्म दिला होता. आज करीना आपल्या पती आणि मुलांसोबत खुश आहे. तथापि एक काळ असा होता जेव्हा करीनाच्या हृदयामध्ये सैफ नाही तर दुसऱ्याच व्यक्तीचे नाव होते.
करीना ज्या व्यक्तीला डेट करू इच्छित होती तो अभिनेता नाही तर प्रासिद्ध राजकारणी आहे. एका चॅट शोमध्ये तिने याचा खुलासा केला होता. वास्तविक करीना कपूरने म्हंटले होते कि तिला कॉंग्रेस नेता राहुल गांधी खूपच आवडतो. जर तिला एखाद्या राजकारणीला डेट करायचे असेल तर ती राहुल गांधीला डेट करेल.
ज्यावेळी अभिनेत्रीने हि गोष्ट म्हंटली होती तेव्हा ती अविवाहित होती आणि राहुल गांधी देखील अविवःत होता. तथापि करीनाचे लग्न झाले आहे आणि तिला दोन मुले आहेत पण राहुल गांधीने अजून लग्न केलेले नाही. करीनाने सिमि गरेवालच्या सिमि गरेवालच्या चॅट शोमध्ये म्हंटले होते कि मी त्यांचे फोटो मॅगझिनमध्ये पाहिले होते आणि विचार केला होता की त्यांच्यासोबत बोलणे कसे होईल. मी फिल्मी कुटुंबातून आहे आणि तो एक राजकारणी कुटुंबातील आहे. यामुळे आमच्यामध्ये रंजक बातचीत होईल.
२००९ मध्ये करीना कपूर स्वतः या वक्तव्यावरून पालटली होती. तिने म्हंटले होते कि हि गोष्ट जुनी आहे. असे मी यामुळे म्हंटले होते कारण आमच्या दोघांचे सरनेम प्रसिद्ध आहे पण कधितर मला त्यांचा पाहुणचार करायचा आहे. मी त्यांना भारताचा प्रधानमंत्री म्हणून पाहू शकते. राहुल गांधीला देखील बॉलीवूडमध्ये करीना कपूर पसंद आहे. तो तिच्या चित्रपटाचे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीना लाल सिंह चड्ढा चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता.