टीव्ही जगतामधील अनेक प्रसिद्ध सिरियल्समध्ये काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री कनिष्का सोनी गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. वास्तविक कनिष्का सोनीने नुकतेच स्वतःसोबत लग्न केले आहे. तिचे फोटो सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती आपल्या भांगेत कुंकू लावलेली दिसत आहे. इतकेच नाही तर कनिष्का सोनीने आपल्या गळ्यामध्ये मंगलसूत्र देखील घातले आहे. कनिष्का सोनीने आपल्या चाहत्यांना हि गोष्ट सांगितल्यानंतर तिला खूपच ट्रोल केले जाऊ लागले. इतकेच नाही तर लोकांनी घाणेरडे कमेंट करायला देखील सुरुवात केली.
यादरम्यान कनिष्का सोनीने खुलासा करताना सांगितले कि का तिने स्वतःसोबतच लग्न केले ? याशिवाय तिने एका निर्मात्याच्या गैरवर्तनाचा देखील खुलासा केला. कनिष्का सोनी स्वतःसोबत लग्न करण्याचे कारण सांगताना म्हणाली कि जेव्हा मी मुंबईला आले होते तेव्हा मला अनेक मुलांनी प्रपोज केले होते. मला १२००-१३०० असे प्रपोजल आले होते. एका फेमस अभिनेत्याने मला लग्नासाठी प्रपोज केले होते पण दोन महिन्यामध्ये त्याचा खरा चेहरा समोर आला तो खूपच वायलेंट होता.
मी त्याचे नाव घेणार नाही पण तो खूपच वायलेंट होता आणि १५ मिनिटाला तो रागवायचा. तो वस्तू फोडायचा आणि मला मारायचा. मला आई नेहमी म्हणाली कि कोणीही अशा व्यक्तीसोबत राहू नये. मी दीड वर्षे हे नाते तसेच रेटले पण नंतर रिलशनशिपमधून बाहेर येण्यासाठी मला ५ वर्षे लागली.
याशिवाय अभिनेत्रीने सांगितले कि ५ वर्षानंतर मी माझ्या को-स्टारसोबत रिलेशनमध्ये आले पण तो एकाचवेळ तीन मुलींना डेट करत होता. जेव्हा मला याबद्दल माहिती झाले तेव्हा तो मला म्हणाला कि तू राधा बनून मला विसरून जा. माझे हृदय पुन्हा तुटले. मला यामधून बाहेर निघायला खूपच कठीण झाले.
याशिवाय कनिष्का सोनीने तिच्यासोबत घडलेली एक घटना देखील शेयर केली, ती म्हणाली कि २००८ मध्ये अडल्ट चित्रपटासाठी प्रोड्युसरने मला घरी येण्यासाठी सांगितले. त्याला माझे पोट बघायचे होते. मी प्रोड्युसरला म्हणाले कि मी अशा चित्रपटामध्ये काम करणार नाही.
View this post on Instagram
पण तो म्हणाला कि, तू जर इथे काम केले नाहीस तर तु कोणत्या चित्रपटामध्ये काम करणार ? तेव्हा मला माझे पोट दाखवणे हि खूप मोठी गोष्ट होती. बाबूभाई दिभा यांचे आभार, मी काही छोटे चित्रपट केले पण माझे स्वप्न प्रियांका चोप्रा आणि कंगना रनौत बनण्याचे होते. कनिष्काने दिया और बाती हम सारख्या मोठ्या शोमध्ये काम केले आहे.