बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतचा लहान भाऊ अक्षतचे शाही लग्न राजस्थानच्या उदयपुरमध्ये धुमधडाक्यात संपन्न झाले. या लग्नामध्ये कंगना खूपच सुंदर दिसत होती. कंगनाने लग्नामध्ये जो लेहंगा आणि कॉस्ट्यूम परिधान केला होता, त्याने तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घातली होती.
परंतु तुम्हाला माहिती आहे का हा लेहंगा बनवण्यासाठी ४२५ दिवस लागले होते. कंगना रनौतने स्वतः ट्वीट करून याची माहिती दिली आहे. कंगनाने सांगितले कि तिच्या भावाच्या लग्नामध्ये तिने जो लेहंगा परिधान केला होता तो १४ महिन्यांमध्ये बनून तयार झाला होता.
कंगनाने ट्वीट करून लिहिले होते कि, प्रत्येकजण माझ्या लेहेंग्याबद्दल विचारत होता. हा एक गुजराती बंधनी लेहंगा आहे, याला बनवण्यासाठी जवळ जवळ १४ महिने लागले होते. डिजाइनर अनुराधा वकीलने हा लेहंगा डिजाइन केला आहे आणि माझे मित्र सब्यसाचीने दागिन्यांचे डिजाइन केले आहे.
कंगनाने या लेहेंग्यासोबत आपले फोटो आणि व्हिडिओ देखील ट्विटरवर शेयर केले. तिने सांगितले कि या पर्पल आणि ब्लू लेहेंग्याला डिज़ाइनर अनुराधा वकीलने डिज़ाइन केले लेहेंग्याची किंमत जवळ जवळ १६ लाख रुपये सांगितली जात आहे. लेहंगा आणि ज्वेलरीमध्ये कंगना रनौतचा लुक लोकांना खूपच आकर्षित करत होता. प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करत होता.
इतकेच नाही तर कंगनाने आपल्या लेहंग्यासोबत जी ज्वेलरी परिधान केली होती, त्याने देखील लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. या ज्वेलरीला बॉलीवूडच्या बेस्ट डिज़ाइनर्सपैकी एक सब्यसाची मुखर्जीने डिज़ाइन केले होते. मिडियामधील चर्चांनुसार या ज्वेलरीसाठी कंगना रनौतने ४५ लाख रुपयेच्या जवळपास खर्च केला आहे.
कंगनाचा भाऊ अक्षतच्या लग्नाचे फंक्शन १२ नोव्हेंबरला होते. कंगनाने लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये आपला सहभाग नोंदवला. तिचे एकापेक्षा एक लुक्स यादरम्यान पाहायला मिळाले. लग्नाच्या सर्व विधीमध्ये ती उपस्थित होती. तिला संगीत फंक्शनमध्ये डांस करताना देखील पाहिले गेले. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.