विक्रम सुपरहिट झाला म्हणून ५ मिनिटाचा रोल करणाऱ्या अभिनेता सूर्याला कमल हसनने दिलेय तब्बल ‘इतक्या’ किंमतीचे ‘घड्याळ’, किंमत जाणून थक्क व्हाल…

By Viraltm Team

Published on:

कमल हसनचा विक्रम चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटामधील कमलच्या भूमिकेचे कौतुक तर होतच आहे त्याचबरोबर विजय सेतुपती आणि फहाद फासीलची भूमिका देखील दर्शकांना खूप आवडत आहे. पण अवघ्या ५ मिनिटाचा रोल करणाऱ्या अभिनेता सूर्याचीच खूप चर्चा होत आहे.

डायरेक्टर लोकेश कनगराज आपले एक यूनिवर्स तयार करत आहे, ज्यामध्ये विक्रमनंतर आगामी येणाऱ्या रोलेक्स चित्रपटामध्ये सूर्या एक खतरनाक निगेटिव्ह भूमिका साकारत आहे. विक्रममध्ये रोलेक्सची एक झलक देखील पाहायला मिळाली आहे आणि यादरम्यान थिएटर्समध्ये खूपच धुमाकूळ झाला.

कमल हसनने सूर्याला आपल्यासोबत काम केल्यासंबंधी सोशल मिडियावरून भरभरून प्रेम दिले आहे आणि कमल हसन इतकेच थांबला नाही तर विक्रममध्ये रोलेक्सची भूमिका करत असलेल्या सूर्याला एक रोलेक्स घड्याळ देखील गिफ्ट दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suriya Sivakumar (@actorsuriya)

गोल्डन आणि व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये सूर्याला दिलेल्या या घड्याळाची किंमत तब्बल ४७ लाख रुपये आहे. सूर्याने याचा एक फोटो शेयर करत हे देखील लिहिले आहे कि अशी एक मुमेंट आयुष्याला सुंदर बनवते. रोलेक्ससाठी आभारी आहे अन्ना!

याआधी कमल हसनने एक उत्कृष्ट चित्रपट बनवल्याबद्दल विक्रमचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांना एक लेक्सस कार देखील गिफ्ट दिली होती. विक्रम चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर २०० करोडचा टप्पा लीलया पार केला आहे.

Leave a Comment