रामनवमीला अजय देवगनने आपला बहुप्रतीक्षित भोला चित्रपट रिलीज केला आहे. दृश्यम नंतर चाहत्यांना अजय देवगनच्या अॅक्शन चित्रपटाची अतुर्तल होती. भोलाच्या प्रमोशनसाठी अजय देवगन खूपच मेहनत करत आहे. त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोल देखील अभिनेत्याची पूर्ण साथ देत आहे. नुकतेच काजोल भोलाच्या स्क्रीनिंग साठी पोहोचली जिथे तिने पापाराझीशी बोलताना म्हंटले कि आज भोला डे आहे.
नुकतेच काजोल भोलाच्या स्क्रीनिंगला पोहोचली होती. जिथे ती पापाराझीशी बोलताना म्हणाली कि आज भोला डे आहे. स्क्रीनिंगवर काजोल मस्टर्ड यलो कलरचा बॉडीकॉन ड्रेस घालून पोहोचली. ज्याला तिने व्हाईट कलरच्या शर्ग आणि व्हाईट कलरच्या शूजसोबत पेयर केले होते. चित्रपट पाहायला गेलेल्या अभिनेत्रीला आपल्या ड्रेसिंग सेंसमुळे खूपच ट्रोल व्हावे लागले. सोशल मिडियावर तिला अनेक युजर्स मेकओवरचा सल्ला देत आहेत.
काजोलच्या ड्रेसिंग सेंस आणि लुकने चाहत्यांना निराश केले आणि त्यांनी अभिनेत्रीला थेट निशाण्यावर घेतले. काजोलच्या व्हिडीओवर कमेंट करत एका युजरने लिहिले कि, प्लीज कोणी हिला कपडे कसे घालायचे ते शिकवा. तर एकाने लिहिले आहे कि हि अशा अभिनेत्रींपैकी आहे जिला मेकओवरची त्वरित गरज आहे.
व्हिडीओवर कमेंट करत एका युजरने काजोलची बॉडी शेमिंग देखील केली. एका युजरने म्हंटले कि तू प्रेग्नंट आहेस का? आणखी एका युजरने कमेंट केली कि तू असे कपडे का घालतेस ज्यामध्ये तू कॅटरपिलर सारखी दिसतेस.अजय देवगनचा भोला चित्रपट कैथी या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे.
चित्रपटामध्ये अजय देवगनसोबत तब्बू, दीपक डोबरियाल आणि शरद केळकर देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. चित्रपतामध्ये भोला नावाच्या कैदीची स्टोरी दाखवली आहे. ज्याची १० वर्षानंतर सुटका होते. भोला आपल्या मुलीला पहिल्यांदा भेटण्यासाठी खूप आतुर आहे, जी अनाथ आश्रमामध्ये राहते. यादरम्यान भोला अशा परिस्थितीमध्ये अडकतो जिथे त्याला प्रत्येक पावलावर मृत्यूला सामोरे जावे लागते. आता भोला त्याच्या मुलीला भेटतो का नाही याभोवतीच चित्रपटाची स्टोरी फिरते
View this post on Instagram