बॉलीवूड अभिनेत्री काजोलने बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. काजोल हिंदी चित्रपटामध्ये आपल्या कामासाठी आणि अभिनयासाठी ओळखली जाते. काजोल कोणत्याही चित्रपटामध्ये आपल्या अभिनयामधून छाप सोडते. हेच कारण आहे कि काजोलचे चाहते तिचा चित्रपट आणि नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहतात. काजोलला आतापर्यंत तुम्ही चित्रपटांमध्ये पाहिले असेल पण अभिनेत्री लवकरच वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टार वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
काजोलची वेब सीरिज लवकरच OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉट स्टारवर रिलीज होणार आहे. शोच्या टीझरमध्ये काजोलचा सुपरहिट चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’चा सीन पुन्हा एकदा दाखवण्यात आला आहे. शोचा टीझर शेयर करताना मेकर्सने लिहिले आहे कि कुछ कुछ हो रहा है, तुम नहीं समझोगे. तुम्हाला माहित झाले का आम्ही काय करत आहोत.
माहितीनुसार हॉटस्टारच्या या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री काजोलचा एकदम हटके लुक पाहायला मिळणार आहे. पण या वेबसिरीजच्या रिलीजबद्दल आणि त्यामधील भूमिकांबद्दल अजून ऑफिशियल ती समोर आलेली नाही.
अभिनेत्री काजोलची हि वेबसिरीज महिलांच्या स्टोरीवर आधारित असू शकते. माहितीनुसार वेबसिरीजमध्ये ती आई आणि पत्नीची भूमिका करणार असल्याचे समोर आले आहे. आता काजोलच्या चाहत्यांना हीच आतुरता लागून राहिली आहे कि काजोलची वेबसिरीज कधी रिलीज होते.
वेबसिरीजमध्ये अनेक नवीन स्टार्सना ओळख मिळाली आहे आणि आता काजोल OTT वर पदार्पण करत आहे. काजोल गेल्या अनेक दिवसांपासून सलाम वेंकी या वेब सीरिजमुळे देखील खूप चर्चेत आहे. आता चित्रपटगृहांनंतर काजोल OTT वर काय कमाल करते हे वेबसिरीज रिलीज झाल्यानंतरच पाहायला मिळेल.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.