६ महिन्यांचा झाला काजल अग्रवालचा मुलगा नील, अभिनेत्रीने भावूक होत शेयर केली नोट…

By Viraltm Team

Published on:

प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालला कोण नाही ओळखत. काजल अग्रवालने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमवल्यानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये देखील ओळख मिळवली. काजल अग्रवालने आपल्या उत्कृष्ट अदाकारीच्या जोरावर जगभरामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. आज ती इंडस्ट्रीमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. काजल अग्रवाल सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय राहते. ती नेहमी चाहत्यांसोबत कोणतीना कोणती पोस्ट शेयर करून संपर्कामध्ये राहत असते.

काजल अग्रवाल सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. ती नेहमी तिचा मुलगा नील किचलूसोबत सुंदर फोटो आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर करत असते. १९ ऑक्टोबर २०२२ ला नील ६ महिन्याचा झाला आहे. या प्रसंगी अभिनेत्री काजल अग्रवालने तिच्या मुलाचा एक सुंदर फोटो शेयर करून एक भावूक नोट देखील लिहिली आहे.

काजल अग्रवालच्या मुलाचे ६ महिने पूर्ण झाल्यानंतर एक खूपच सुंदर फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये नील खूपच क्युट दिसत आहे. या फोटोमध्ये पाहू शकता कि नील आपले लहान माथ्यावर ठेवलेला दिसत आहे. त्याची क्युट स्माईल चाहत्यांचे मन जिंकत आहे. काजल अग्रवाल द्वारे शेयर केलेले हे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हे फोटो शेयर करण्यासोबतच काजल अग्रवालने एक भावूक नोट देखील लिहिली आहे.

काजल अग्रवालने लिहिले आहे कि मला विश्वास बसत नाही आहे कि गेले ६ महिने किती वेगाने गेले आहेत. माझ्या जीवनामध्ये जो बदल झाला आहे मी त्यावर विश्वास ठेऊ शकत नाही आहे. मी एका घाबरलेल्या मुलीसारखे माझ्या मुलाला माझ्या छातीशी धरून विचार करत होते कि मी एका आईचे कर्तव्य कसे पूर्ण करू शकेन. कामाचे संतुलन करणे आणि वेळ, लक्ष, प्रेम आणि तुझी काळजी यामध्ये कधीच तडजोड करणार नाही.

काजल अग्रवालने पुढे लिहिले आहे कि तू फरशीवर इकडे तिकडे लोळतोस तेव्हा असे वाटते कि अजून फक्त एकच रात्र झाली आहे. आता हि तुझी पहिली सर्दी आहे, पहिल्यांदा पूलमध्ये, समुद्र आणि आता खायला देखील शिकला आहेस. तुझे बाबा चेष्टेमध्ये म्हणतात कि तू पुढच्या आठवड्यामध्ये कॉलेजमधेय जाणार आहेस. कारण इतक्या वेगाने तू मोठा होत आहेस. मी या गोष्टीने चकित झाले आहे कि तू जीवनामधील प्रत्येक छोट्या क्षणाला कशाप्रकारे घेतोस. माझ्याजवळ आतापर्यंतचे सर्वात आव्हानात्मक काम आहे. तुझ्यासाठी हाफ वे १, माझ्या प्रिय, माझ्या बाळा नील.

काजल अग्रवाल आणि गौतम किचलूने २०२० मध्ये लग्न केले होते. यानंतर कपलने २०२२ मध्ये नवीन वर्षाचे औचित्य साधून प्रेग्नंसीची घोषणा केली होती. काजल अग्रवालने १९ एप्रिल २०२२ रोजी तिचा मुलगा नील किचलूला जन्म दिला होता. नीलच्या जन्मानंतर काही दिवसांनंतरच काजलने फोटो देखील चाहत्यांसोबत शेयर केले होते.

Leave a Comment