अभिनेत्री काजल काजल अग्रवालने ब्रेस्टफीडिंगबद्दल केले मोठे वक्तव्य, म्हणाली; ब्रेस्टफीडिंग करताना मला…

By Viraltm Team

Published on:

प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. १९ मे २०२२ रोजी काजल आणि तिचा पती गौतम किचलूने त्यांचा मुलगा नीलचे स्वागत केले होते. तेव्हापासून दोघांचे आयुष्य हे फक्त त्यांच्या मुलाच्या अवतीभवती फिरत आहे.

२०२० मध्ये काजल आणि गौतमने लग्न केले होते यानंतर २०२२ मध्ये काजलने न्यू ईयरच्या निमित्ताने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. १९ एप्रिल २०२२ रोजी तिने आपल्या मुलाला जन्म दिला. डिलिव्हरीनंतर काजल चित्रपटांपासून दूर आहे. नुकतेच काजलने फ्रीडम टू फीड मोहिमेअंतर्गत अभिनेत्री नेहा धुपियाशी संवाद साधला. यादरम्यान तिने आपल्या प्रेग्नंसीच्या जर्नीबद्दल सांगितले.

ती म्हणाली कि मी प्रेग्नंसीदरम्यान काम केले होते, माझ्याजवळ अनेक प्रोजेक्ट्स होते, जे मला पूर्ण करायचे होते. मी हे प्रोजेक्ट्स लवकरच संपण्याचा प्रयत्न करत होते. नीलच्या जन्मानंतर ४० दिवसांपर्यंत मला आईने बाहेर निघू दिले नाही. पण नंतर मी काम केले होते. माझे बाळ दुसऱ्या खोलीमध्ये होते आणि मी आईच्या घरामध्ये शुटींग करत होते.

काजलने आपल्या डिलिव्हरीमधील अनुभव शेयर करताना सांगितले कि मी डिलिव्हरीदरम्यान ध्यान करण्याचा प्रयत्न करत होते, मी त्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करत होते ज्याबद्दल मला सांगितले गेले होते. तथापि जसे माझे बाळ माझ्या समोर आले तसे त्याच्यासमोर सर्व जग फिक्के पडले. त्याला पाहून मी रडत होते, आणि त्याच्या समोर येण्याने प्रेग्नंसीच्या नऊ महिन्यामधील सर्व अडचणी गायब झाल्या. माझ्यासाठी माझ्या बाळाशिवाय काहीही महत्वाचे नव्हते.

यासोबत काजलने कामामुळे आपल्या मुलाला एकटे सोडण्याबद्दल देखील सांगितले ती म्हणाली, माझ्यासाठी जिमला जाणे खूपच अवघड काम आहे. सुदैवाने मला घरामधून हेल्प मिळते. सुरुवातीला मुलाला एकटे सोडणे खूपच अवघड होते. मी नेहमी चिंतीत असायचे. कोणालातरी नीलसोबत राहणे जरुरीचे होते आणि त्याच्याजवळ दुसरे कोणीही नाही तर मला असायला हवे. जेव्हा मी सेटवर पाउल ठेवते मग तो चित्रपटाचा असो किंवा जाहिरातीचा एक दिवसदेखील शुटींगसाठी मी त्याला एकटे सोडू इच्छित नाही. असे करणे मला खूपच वाईट वाटते.

काजल अग्रवालने आपल्या डिलिव्हरी दरम्यानची देखील आठवण करून दिली. ती म्हणाली कि ब्रेस्टफीडिंग करणे तिच्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. यानंतर ती म्हणाली कि डायरेक्ट ब्रेस्टफीडिंग करण्यासाठी खूपच उत्सुक होते, पण सुरुवातीला थोडे आव्हानात्मक होते. कारण माझा बाळाला वेदना होत होत्या. यामुळे मला सुरुवातीला खूप अवघड वाटले आणि मी यासाठी ब्रेस्टफीडिंग तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

Leave a Comment