करण जौहरच्या कभी खुशी कभी गम ब्लॉकबस्टर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. चित्रपटामध्ये दिसलेल्या सुपरस्टार शाहरुख खान आणि काजोलच्या जोडीने कमाल केली होती. याशिवाय करीना आणि ऋतिक रोशनची जोडी देखील खूप पसंद केली गेली होती. पण यामध्ये एक क्युट मुलगा देखील खूपच चर्चेमध्ये आला होता.
आम्ही इथे चित्रपटामध्ये दिसलेल्या काजोल आणि शाहरुख खानच्या मुलाच्या भूमिका दिसलेल्या कृष बद्दल सांगत आहोत. कृषचे खरे नाव जिब्रान खान आहे आणि आता तो खूप मोठा झाला आहे. नुकतेच त्याचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये चाहते त्याचे खूपच कौतुक करत आहेत.
जिब्रान खानने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कभी खुशी कभी गम चित्रपटामध्ये त्याला कृषच्या भूमिकेमधून खूप लोकप्रियता मिळाली. त्याने गोविंदाच्या क्योंकि मैं झूठ नहीं बोलता चित्रपटामध्ये देखील काम केले होते. या चित्रपटामध्ये त्याने गोविंदा आणि सुश्मिताच्या मुलाची भूमिका केली होती.
यानंतर तो अनिल कपूर आणि करिष्मा कपूरच्या रिश्ते चित्रपटामध्ये देखील दिसला होता. त्याचा अभिनय दर्शकांना खूप पसंद आला होता. याशिवाय जिब्रान खानने विष्णु पुराण नावाच्या टीव्ही सिरीयलमध्ये देखील काम केले होते आणि आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले होते.
जिब्रान खानने सोशल मिडियावर कभी ख़ुशी कभी गम चित्रपटाचा एक व्हिडीओ शेयर केला होता ज्यामध्ये तो हे म्हणताना दिसत आहे कि आयुष्यामध्ये काहीतरी मिळवायचे असेल तर, काही जिंकायचे असेल तर नेहमी आपल्या मनाचे ऐकावे, आणि जर मनाचे काही उत्तर नाही आले तर तुमचे डोळे बंद करून आपल्या आईवडिलांचे नाव घ्या. मग पहा तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकाल.
जिब्रान खानच्या नवीन लुकला पाहून चाहते खूपच हैराण झाले आहेत. कोणालाच यावर विश्वास होत नाही आहे कि तो लहान कृष आता असा दिसू लागला आहे. त्याचा डॅशिंग लूक एखाद्या मोठ्या अभिनेत्यापेक्षा कमी नाही. लोकांचे असे मानणे आहे कि जर जिब्रान खानने हिरो म्हणून काम केले तर त्याला खूप मोठी ओळख मिळू शकेल.
जिब्रान खान बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता फिरोज खानचा मुलगा हे. तथापि त्याने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये काम करण्यसाठी कधीच आपल्या वडिलांचे नाव वापरले नाही. जिब्रान खानचे मानणे आहे कि त्याला आपल्या मेहनतीवर बॉलीवूडमध्ये नाव कमवायचे आहे. फिरोज खानने आपल्या करियरमध्ये करण अर्जुन सरख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. याशिवाय महाभारत सिरीयलमध्ये अर्जुनच्या भूमिकेसाठी देखील त्याला ओळखले जाते. जिब्रान खानने करण जोहरसोबत ब्रह्मा शास्त्र चित्रपटाच्या पडद्याच्या मागे काम केले आहे.
View this post on Instagram