बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला बऱ्याच काळापासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. पण ती सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते. जुही चित्रपटांपासून दूर जरूर आहे पण ती एक सफल शेतकरी देखील आहे. यादरम्यान जुही चावलाने आपल्या नवीन ऑफिसचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. तिचे नवीन ऑफिस इतके सुंदर आहे कि चाहत्यांना देखील ते खूप आवडले आहे. वास्तविक जुहीचे ऑफिसवर वाडा स्थित तिचं फार्महाऊसमध्ये आहे. मोकळ्या आकाशाखाली झाडाच्या सावलीत बसलेल्या जुहीने आपले ऑफिस सर्वांना दाखवले. जुहीने या नवीन ऑफिसचे दोन फोटो शेयर केले आहेत.
एका फोटोमध्ये ती आंब्याच्या बागेत खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिच्यासमोर एक टेबल आहे, ज्यावर ती लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे आणि फोटोमध्ये ती हसताना दिसत आहे. त्याचबरोबर सर्व आंबे एकत्र करून तिच्या टेबलच्या समोर ठेवले जातात. दुसऱ्या एका फोटोमध्ये जुही चावला एका झाडाच्या खाली खुर्चीवर बून आपल्या टीम आणि स्टाफ मेंबर्ससोबत बोलताना दिसत आहे. जुही चावलाने या फोटोंन सोशल मिडियावर शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि तिने वाडामध्ये आपले नवीन ऑफिस उघडले आहे. ज्यामध्ये एसी आणि ऑक्सीजन आहे. याशिवाय ती या ऑफिसचा विस्तार करण्याचा देखील विचार करत आहे.
जुहीचे चित्रपटांपासून दूर शेतामध्ये रमले आहे. जुहीचे मुंबईच्या बाहेर मांडवा आणि वाडा भागामध्ये दोन फार्महाऊस आहेत. जुही या जमिनींचा वापर जैविक्त शेतीसाठी करते. हि शेती तिच्या वडिलांनी जवळ जवळ २० वर्षांपूर्वी खरेदी केली होती, ज्याची देखभाल जुही अजूनदेखील करते. लॉकडाऊनमध्ये जुहीने तिच्या फार्महाऊसवर जास्तीत जास्त वेळ घालवला होता आणि जैविक शेती केली होती. जुहीने आपल्या शेतामध्ये बटाटा, टोमॅटो, मेथी, कोथमिर यांसारख्या सेंद्रिय जातीच्या भाज्या पिकवल्या आहेत.
याशिवाय तिच्या फार्म हाऊसमध्ये फळांच्या बागा देखील आहेत. लॉकडाऊनच्या काळात जुहीने भूमिहीन शेतकर्यांिसाठी त्यांच्या फार्म हाऊसचे दरवाजे उघडे ठेवले होते. जुहीने त्यांच्यावर विश्वास दाखवला कि ते तिच्या जमिनीवर शेती करून त्यांची उपजीविका करू शकतात.
जुहीचे फार्महाऊस सुंदर आणि बाहेर हिरवाईने भरलेले आहे. जुहीने आपल्या फार्महाऊसमध्ये अनेक प्रकारच्या सेंद्रिय भाताची लागवड केली आहे. सध्या ती चित्रपटापासून दूर आहे आणि आपली पर्सनल लाईफ आनंदाचे जगत आहे. जुही चावला नेहमी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या शेताचे फोटो शेयर करत असते.
जुही चावलाने वाडा फार्महाऊसमध्ये बनवले आपले नवीन ऑफिस, चित्रपटांपासून दूर करत आहे शेती…
By Viraltm Team
Published on: